• Download App
    देशात दुसरी लाट वेगाने ओसरतेय ;  ७४ दिवसांमध्ये प्रथमच आढळले ७० हजारांवर रुग्ण। Coronavirus: Waves recede rapidly; For the first time in 74 days, over 70,000 patients

    देशात दुसरी लाट वेगाने ओसरतेय ;  ७४ दिवसांमध्ये प्रथमच आढळले ७० हजारांवर रुग्ण

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ७४ दिवसांत प्रथमच ७० हजारांवर रुग्ण आढळले आहेत. Coronavirus: Waves recede rapidly; For the first time in 74 days, over 70,000 patients
    गेल्या २४ तासांत ७०,४२१ रुग्ण आढळले आहेत. ३,९२१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ७४ दिवसांत एवढे कमी रुग्ण प्रथमच आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आता एकूण रुग्णसंख्या २,९५,१०,४१० झाली आहे.

    २४ तासांत १,१९,५०१ जण आजारातून पूर्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या २,८१,६२,९४७ आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. ६ मे रोजी सर्वाधिक ४ लाख १४ हजार रुग्ण आढळले होते.



    दृष्टिक्षेपात कोरोना

    • एकूण रुग्णसंख्या : दोन कोटी ९५ लाख १० हजार ४१०
    • उपचाराधीन रुग्णसंख्या : ९ लाख ७३ हजार १५८ (३.३० टक्के )
    • एकूण मृत्यू : ३,७४,३०५
    • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण : ९५.४३ टक्के
    • पॉझिटिव्हचे प्रमाण : ४.७२ टक्के
    • संसर्ग रोखण्यासाठी : धारावी पॅटर्नच बेस्ट

    Coronavirus: Waves recede rapidly; For the first time in 74 days, over 70,000 patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार