वृत्तसंस्था
नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. CoronaVirus News modi government bans export of covid 19 rapid antigen testing kit
देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आता ५० हजारांच्या आत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची.त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटचा देशात तुटवडा पडू नये, यासाठी मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
परराष्ट्र व्यापार महासंचलनालयानं (डीजीएफटी) याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटला निर्यातबंदीच्या यादीत टाकण्यात आलं आहे. हा निर्णय त्वरित लागू झाला आहे,’ असं डीजीएफटीनं अधिसूचनेत नमूद केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट आल्यास भारताला मोठ्या संख्येने चाचण्या कराव्या लागतील. त्याची तयारी म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर त्या परिस्थितीत देशातच कोरोना टेस्टिंग किट उपलब्ध असावीत या उद्देशाने किटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
CoronaVirus News modi government bans export of covid 19 rapid antigen testing kit
महत्त्वाच्या बातम्या
- जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले
- शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
- पेगाससचा हेरगिरीचा मुद्दा संवेदनशील, तो विरोधकांनी सनसनाटी बनविला; सरकार स्वतंत्र चौकशी समिती बनविण्यास तयार; सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र
- राज्यपालांनी ८० व्या वर्षी सर केला सिंहगड, महिलांनी कौतुकाने ओवाळले; उत्तराखंडमध्ये येण्याचे स्थानिकांना आमंत्रण
- शिवाजी महाराज हे देशाचा अभिमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली सिंहगडाला भेट