• Download App
    मृतदेहापासून 12 ते 24 तासापर्यंत संसर्गाचा धोका नाही ; एम्सचा अभ्यासानंतर खुलासा Coronavirus Does Not Remain Active In Nasal Oral Cavities After Death Says Aiims Forensic Chief

    Coronavirus infection : मृतदेहापासून 12 ते 24 तासापर्यंत संसर्गाचा धोका नाही ; एम्सचा अभ्यासानंतर खुलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तरी त्याच्या देहापासून 12 ते 24 तासांपर्यंत कोणताही संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होत नाही, असे दिल्लीमधील भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सने अभ्यासानंतर स्पष्ट केले आहे. Coronavirus Does Not Remain Active In Nasal Oral Cavities After Death Says Aiims Forensic Chief

    एम्सच्या फॉरेन्सिंग विभागाचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरामधील विषाणू निष्क्रिय होतात. तसेच मृतदेहातून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मृतदेहांवर प्रोटोकॉलप्रमाणेच अंत्यसंस्कार केले पाहिजे, असं नवी दिल्लीमधील भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्समधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

    अभ्यासातील निष्कर्ष…

    1 ) एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नाक किंवा तोंडामध्ये विषाणू आढळून येत नाहीत.

    2 ) १०० मृतदेहांच्या चाचण्या केल्या. त्यातून हे निष्कर्ष काढले आहेत.

    3) मृतदेहांच्या नाक आणि घशातील स्वॅब घेऊन चाचण्या केल्या. तेव्हा त्यांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

    4) एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांमध्ये शरीरामधून निघणाऱ्या द्रव्य पदार्थांसंदर्भात खबरदारी घेणं गरजेचे आहे. त्यामुळे मृतदेहांच्या थेट संपर्कात येणं टाळलेलं अधिक योग्य ठरतं.

    5) एम्समधील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मृतदेह कशापद्धतीने हाताळावेत यासंदर्भातील नियमावली तयार केली आहे.

    6) एम्समधील अभ्यासात मिळालेल्या माहितीच्या आधारेच मृताच्या अंत्यसंस्काराबाबतचे निर्देश सरकारकडून जारी केले आहेत.

    7) कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह हाताळताना ग्लोव्हज, पीपीई कीट घालूनच काम करण्याचे निर्देश नियमावलीमध्ये आहेत.

    8) अंत्यसंस्कार केल्यानंतर धार्मिक विधीसाठी अस्थी गोळा करणे हे पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळाही दिला.

    9) कोरोनाबाधित व्यक्तीचे शवविच्छेदन टाळावे. त्यामुळे मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण कमी करता येईल.

    Coronavirus Does Not Remain Active In Nasal Oral Cavities After Death Says Aiims Forensic Chief

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची