• Download App
    Coronavirus Cases In India : देशात 13 एप्रिलनंतर पहिल्यांदा २ लाखांहून कमी रुग्णांची नोंद, मागच्या 24 तासांत 3511 जणांचा मृत्यू । Coronavirus Cases In India today, Less Than 2 lakh patients Found In Just 24 Hours

    Coronavirus Cases In India : देशात १३ एप्रिलनंतर पहिल्यांदा २ लाखांहून कमी रुग्णांची नोंद, मागच्या २४ तासांत ३५११ जणांचा मृत्यू

    Coronavirus Cases In India : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागल्याचे चित्र आहे. मागच्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 96 हजार 427 नवीन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच देशात दोन लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 13 एप्रिलला देशात 1 लाख 84 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मागच्या 24 तासांत कोरोनामुळे 3511 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3 लाख 26 हजार 850 लोक बरे होऊन घरेही गेले आहेत. Coronavirus Cases In India today, Less Than 2 lakh patients Found In Just 24 Hours


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागल्याचे चित्र आहे. मागच्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 96 हजार 427 नवीन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच देशात दोन लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 13 एप्रिलला देशात 1 लाख 84 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मागच्या 24 तासांत कोरोनामुळे 3511 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3 लाख 26 हजार 850 लोक बरे होऊन घरेही गेले आहेत.

    देशातील कोरोनाची सद्य:स्थिती

    एकूण रुग्णसंख्या – 2 कोटी 69 लाख 48 हजार 874
    एकूण बरे झालेले – 2 कोटी 40 लाख 54 हजार 861
    एकूण मृत्यू – 3 लाख 7 हजार 231
    एकूण सक्रिय रुग्णसंख्या – 25 लाख 86 हजार 782
    एकूण लसीकरण – 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 रुपये

    इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे की, काल भारतात 20 लाख 58 हजार 112 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यानंतर कालपर्यंत देशात एकूण 33 कोटी 25 लाख 94 हजार 176 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

    18 दिवसांपासून कोरोना संसर्गात झपाट्याने घट

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 18 दिवसांपासून भारतात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहेत. 18 दिवसांत 3 लाखांहून कमी रुग्णांची नोंद होत आहे. बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तर सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 15 आठवड्यांत नमुन्यांच्या तपासणीत 2.6 पट वाढ झाली आहे, तर गेल्या दोन आठवड्यांपासून साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे.

    Coronavirus Cases In India today, Less Than 2 lakh patients Found In Just 24 Hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य