• Download App
    कोरोनाचा काळ ठरला अब्जाधीशांसाठी वरदान; संपत्तीत वाढ; २५ वर्षे शाळा आणि महाविद्यालये चालविण्याची क्षमता Corona's time was a boon for billionaires; Increase in wealth; Ability to run schools and colleges for 25 years

    कोरोनाचा काळ ठरला अब्जाधीशांसाठी वरदान; संपत्तीत वाढ; २५ वर्षे शाळा आणि महाविद्यालये चालविण्याची क्षमता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना काळात श्रीमंतांच्या संपत्तीत निरंतर वाढ झाल्याचा एक अहवाल प्रसिद्ध झाला असून अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट झाल्याचे उघड झाले आहे. देशातील ९८ अब्जाधीशांकडे ५५ काेटी गरिबांएवढी संपत्ती असल्याचे ऑक्सफॅम इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे.Corona’s time was a boon for billionaires; Increase in wealth; Ability to run schools and colleges for 25 years

    देशातील टॉप १० अब्जाधीशांकडे एवढी संपत्ती आहे की त्यांनी देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये या संपतीतून ते २५ वर्ष चालवू शकतात.



    ऑक्सफॅमने ‘इनसाईड इंडियाज इनइक्वालिटी क्रायसिस- अ कन्ट्री ऑफ बिलियनिअर्स’ हा अहवाल तयार केला आहे. वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरमच्या पूर्वी ताे सादर केला. त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली. काेराेना हा गरिबांच्या जिवांवर उठला असताना श्रीमंत अब्जाधीशांसाठी महामारी वरदान ठरली आहे.

    श्रीमंतांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे, तसेच अब्जाधीशांची संख्याही १०२ वरून १४२ वर गेली आहे.  त्यातील ९८ अब्जाधीशांकडे तब्बल ४९.२७ लाख काेटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील ५५.२ काेटी गरिबांकडे मिळून एवढी संपत्ती आहे.

    काेराेनात ४.६ काेटी नागरिक गरीब झाले आहेत. केवळ १० टक्के लाेकांकडे ४५ टक्के पैसा आहे. देशातील ४५ टक्के पैसा केवळ १० टक्के लाेकांकडे आहे. ९८ अब्जाधीशांची संपत्ती भारत सरकारच्या एकूण बजेटच्या जवळपास ४१ टक्के आहे. टाॅप १० श्रीमंतांनी दरराेज ७.४ काेटी रुपये खर्च केले, तरीही त्यांची संपत्ती पूर्णपणे खर्च हाेण्यासाठी ८४ वर्षे लागतील.

    Corona’s time was a boon for billionaires; Increase in wealth; Ability to run schools and colleges for 25 years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!