• Download App
    कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?; कानपूर तज्ज्ञांच्या पथकातील शास्त्रज्ञाचा अंदाज|Corona's third wave reach its peak in October ?; The prediction of the scientist of the team of Kanpur

    कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?; कानपूर तज्ज्ञांच्या पथकातील शास्त्रज्ञाचा अंदाज

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ देशात तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल, असा साथरोग तज्ज्ञांच्या अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासून खबरदारी घेतली पाहिजे.Corona’s third wave reach its peak in October ?; The prediction of the scientist of the team of Kanpur

    देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. केरळ राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल, असा दावा करण्यात आला आहे.



    साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे.

    कोरोनावर लसीकरणाची मात्राच प्रभावी

    कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव आणि अत्यंत प्रभावी मार्ग आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना नियंत्रणात आणण्याचे महत्वाचे काम कोरोनाविरोधी लसीच्या डोसने केले आहे. केंद्र सरकारने नागरिकांच्या लसीकरणासाठी मोठे प्रयत्न करत आहे.

    अवाढव्य लसीकरणाचे शिवधनुष्य केंद्र आणि आरोग्य यंत्रणांनी उचलले आहे. ते आणखी पेलून धरण्यासाठी जनतेने स्वतः पुढाकार घेऊन लसीचे डोस घेतले पाहिजेत. लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना अजून पूर्णपणे कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढत आहे.त्यामुळे कोरोना लसीकरण करणे काळाची गरज आहे.

    केंद्राने एका दिवसांत २.५ कोटी डोस देऊन जागतिक विक्रम केला आहे. तसेच अनेकदा एक कोटी डोस जनतेला एका दिवसात दिले आहेत. ही जमेची बाबू आहे. तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल ,असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे वेळ न दवडता लसीकरणासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे.

    Corona’s third wave reach its peak in October ?; The prediction of the scientist of the team of Kanpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची