Corona vaccine : नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुतनिक-व्ही आणि मोडर्ना या लशी स्तनपान देणाऱ्या मातांसाठी सुरक्षित आहेत आणि वंध्यत्वाशी त्यांचा काहीही संबंध नाही. Corona vaccine is safe for pregnant women there is no harm to lactating mothers too said Central Government
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुतनिक-व्ही आणि मोडर्ना या लशी स्तनपान देणाऱ्या मातांसाठी सुरक्षित आहेत आणि वंध्यत्वाशी त्यांचा काहीही संबंध नाही.
ते म्हणाले, गर्भवती महिलांना लसीकरणासंबंधी मार्गदर्शक सूचना लवकरच देण्यात येणार आहेत. ही लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे. आरोग्य मंत्रालय याचा अधिक तपास करत आहे. व्ही.के. पॉल यांनी असेही म्हटले की, आपत्कालीन वापरासाठी मोडर्नाची लस मंजूर झाली आहे.
आपत्कालीन वापरासाठी मोडर्नाची लस मंजूर
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपत्कालीन वापरासाठी मोडर्नाची लस मंजूर झाली आहे. मर्यादित वापरासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. ते म्हणाले, “आता देशात कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक-व्ही आणि मोडर्ना या चार लसी उपलब्ध आहेत. आम्ही लवकरच फायझरशी करार करणार आहोत.”
त्याच वेळी, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल म्हणाले की, देशात कोरोना रुग्णसंख्येत जी प्रचंड वाढ झाली होती, ती गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने घटत आहे.
ते म्हणाले, ज्या जिल्ह्यात दररोज 100 हून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत, जिथे 4 मेच्या आठवड्यात असे 531 जिल्हे होते, ती संख्या 2 जून रोजी 262 जिल्ह्यांवर खाली आली आहे आणि आता फक्त 111 जिल्हे असे आहेत जिथे दररोज 100 हून अधिक रुग्ण आढळत आहेत.
Corona vaccine is safe for pregnant women there is no harm to lactating mothers too said Central Government
महत्त्वाच्या बातम्या
- तृणमूलच्या गुंडांचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकावरही हल्ला, बंगाल हिंसाचाराची चौकशी करताना अडथळे
- इस्रायलसारखी भारताचीही ड्रोन डिफेन्स डोम सिस्टिम, ‘इंद्रजाल’च्या साहाय्याने एकाच वेळी अनेक ड्रोन्स पाडण्याची क्षमता
- बंगाल हिंसाचारावर फॅक्ट फायंडिंग समितीचा गृह मंत्रालयाला अहवाल सादर, निवडणुकीनंतरची हिंसा पूर्वनियोजितच!
- T20 World Cup : क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार विश्वचषक, 14 नोव्हेंबरला फायनल
- अमेरिकेकडून भारताला 4.1 कोटी डॉलरचे अतिरिक्त साहाय्य, कोरोना नियंत्रणासाठी मिळणार मदत