corona vaccine first jab : जगात कोरोना लसीचा पहिला डोस घेणारे पुरुष विल्यम शेक्सपियर यांचे निधन झाले आहे. विल्यम शेक्सपियर ऊर्फ बिल शेक्सपियर यांनी मंगळवारी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूशी कोरोना लसीचा काहीही संबंध नाही. corona vaccine first jab william shakespeare dies of unrelated illness
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगात कोरोना लसीचा पहिला डोस घेणारे पुरुष विल्यम शेक्सपियर यांचे निधन झाले आहे. विल्यम शेक्सपियर ऊर्फ बिल शेक्सपियर यांनी मंगळवारी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूशी कोरोना लसीचा काहीही संबंध नाही.
डिसेंबर 2020 मध्ये 81 वर्षीय शेक्सपियर यांनी कोव्हेंट्री रुग्णालयात कोरोनाची पहिली लस घेतली. कोरोनाची लस घेणारे ते जगातील पहिले पुरुष ठरले होते. त्यांच्या लस घेणच्या काही मिनिटांपूर्वी 91 वर्षीय मार्गारेट केनन यांनी डोस घेतला होता, त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. बीबीसीच्या वृत्तानुसार, शेक्सपियरच्या नातेवाइकांनी आवाहन केले आहे की, सर्वांनी कोरोनाची लस घेणेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बिल शेक्सपियर यांनी सलग तीन दशके समाजसेवा केली.
2019 मध्ये कोरोना जगभरात पसरायला सुरुवात झाली, त्यानंतर एका वर्षाने डिसेंबर 2020 मध्ये त्यावरील लस उपलब्ध झाली. सर्वात पहिले फायझर-बायोटेकचीच लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर शेक्सपियर यांनी संपूर्ण जगाला ही लस घेण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या शेक्सपियर या नावामुळेही त्यांची जगभरात चर्चा झाली होती.
corona vaccine first jab william shakespeare dies of unrelated illness
महत्त्वाच्या बातम्या
- Fact Check : कोरोनाची लस घेतल्याने 2 वर्षांत मृत्यू होतो? जाणून व्हायरल मेसेजमागचे सत्य!
- Sputnik Lite : स्पुतनिकच्या सिंगल डोस व्हॅक्सिनची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात
- कोरोनाच्या उत्पत्तीवरून अमेरिकेने चीनला फटकारले, व्हाइट हाऊसचे शास्त्रज्ञ म्हणाले- चीनचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचे!
- इंडियन मेडिकल असोसिएशनचा रामदेव बाबांविरुद्ध १००० कोटींचा मानहानीचा दावा, म्हणाले- लेखी माफी मागा!
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’