विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणामुळे पुरुष आणि महिलांमध्ये नपुंसकत्व येते, असे दर्शविणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.कोरोना लशी या पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावाही करण्यात आला आहे.Corona vaccine didn’t harmful
कोरोना लसीकरणासंबंधीच्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या असून त्यामध्ये स्तनदा मातांनाही लस देण्यात यावी असे म्हटले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर आणि ती घेण्याआधी स्तनपान थांबविण्याची गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
मध्यंतरी कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्याने पुरुष आणि महिलांमध्ये नपुंसकत्व येत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली होती. आरोग्य मंत्रालयाने या अनुषंगाने आज स्पष्टीकरण दिले. या लशींच्या आधी प्राण्यांवर चाचण्या घेतल्या जातात तेव्हाच त्याचे दुष्परिणाम होतात की नाही हे पडताळून पाहिले जाते. सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्यानंतरच लशींच्या वापरास परवानगी दिली जाते असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
Corona vaccine didn’t harmful
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राने घ्यावा योगी आदित्यनाथ सरकारचा धडा, सामान्यांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना दणका देत ५०० कोटी रुपयांची संपत्ती केली जप्त
- राज्यांकडे ७३ लाखांवर कोरोना लसींचे डोस अद्यापही शिल्लक, तीन दिवसांत २५ लाखांवर डोस आणखी पोहोचविणार
- लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवा, लोकांना प्रोत्साहित करा, पंतप्रधानांचे मंत्र्यांना आवाहन
- पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये, बुरखा फाटतोय म्हणून धमक्या, शिवीगाळ, मोटारीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा आरोप
- ट्विटरवरील सर्व अश्लिल मजकूर काढून टाका, राष्टीय महिला आयोगाची दिल्ली पोलीसांकडे मागणी