Corona Vaccination : राज्यांनी दिलेल्या विविध सूचना तसेच केंद्री आरोग्य मंत्रालयाने 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी दिलेल्या इनपुटच्या आधारे केंद्र सरकारने आता जागेवरच नोंदणी करणे आणि सहायक समूह नोंदणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. corona vaccination onsite registration for 18 44 years group know new rules for vaccination
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राज्यांनी दिलेल्या विविध सूचना तसेच केंद्री आरोग्य मंत्रालयाने 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी दिलेल्या इनपुटच्या आधारे केंद्र सरकारने आता जागेवरच नोंदणी करणे आणि सहायक समूह नोंदणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लसीकरणाचे नवीन नियम
1) ऑनलाइन स्लॉट्सच्या आयोजित सत्रात जर लोक लस घ्यायला आले नाहीत आणि दिवसाच्या शेवटी, काही डोस बाकी आहेत तर अशा परिस्थितीत लसीचा अपव्यय कमी करण्यासाठी काही लाभार्थींची नोंदणी जागेवर करून त्यांना लस दिली जाऊ शकते.
2) CoWin द्वारे एका मोबाइल क्रमांकावरून 4 लाभार्थींची नोंदणी होते, आरोग्य सेतू आणि उमंग अॅपच्या माध्यमातून नोंदणी आणि अपॉइंटमेंट दिली जाते. ज्यांच्याजवळ इंटरनेट अथवा स्मार्टफोन नाही किंवा ज्यांच्याकडे मोबाइल फोनच नाही, अशांचे लसीकरण करणसाठी कोहार्ट फॅसिलिटी देता येईल.
कोविन वरही 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी ऑनसाइट रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट सुरू करण्यात आले आहे. ही सुविधा सध्या फक्त सरकारी कोविड लसीकरण केंद्रांसाठी उपलब्ध आहे. ही सुविधा सध्या खासगी कोविड लस केंद्रांसाठी उपलब्ध होणार नाही आणि खासगी केंद्रांना त्यांचा लसीकरण कार्यक्रम खासकरून ऑनलाइन अपॉइंटमेंटसाठी स्लॉटसह प्रकाशित करावा लागेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना 18 ते 44 वयोगटासाठी ऑनसाइट रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट सुविधेचा वापर करण्याची सीमा आणि पद्धतीच्या बाबतीत काटेकोर अंमलबजावणीसाठी स्पष्ट निर्देश जारी करण्यास सांगितले आहे.
कोहार्ट समूहांसंबंधी लाभार्थींना लसीकरण सेवा प्रदान करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र सत्रही आयोजित केले जाऊ शकतात. जिथे कुठे अशा प्रकारच्या पूर्ण राखीव सत्राचे आयोजन केले जाईल, तेथे अशा लाभार्थींना पुरेशा प्रमाणात आणण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जावेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सल्ला दिला आहे की, लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून 18 ते 44 वयोगटासाठी ऑनसाइट रजिस्ट्रेशन लागू करताना सावधगिरी बाळगावी. कारण या निर्णयामुळे केंद्रांवर अत्याधिक गर्दी जमण्याची शक्यता आहे.
corona vaccination onsite registration for 18 44 years group know new rules for vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांकडून पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक, केंद्र सरकारला दिले 10 पैकी 9 गुण
- संतापजनक : बिलामध्ये 11 हजार कमी पडल्यावर हॉस्पिटलने घेतले रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र
- Roche-Cipla Corona Medicine : कोरोनावर बाजारात आले औषध, एका डोसची किंमत 60 हजार रुपये
- Marriage In Flying Plane : लॉकडाऊनमुळे विमानच बनलं मंगल कार्यालय, वधु-वरांनी आसमंतात बांधली रेशीमगाठ
- आत्मनिर्भर उपक्रमाचा छोट्या व्यावसायिकांना मोठा फायदा, टियर 2 सिटी स्टार्टअपला मिळाले केंद्राचे पाठबळ