वृत्तसंस्था
हैदराबाद : कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेत आता टपाल विभागाने सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत कोरोना लसीकरणासाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे तेलंगण राज्यातील ग्रामीण भागात लसीकरण नोंदणी सुविधेला प्रारंभ झाला आहे. Corona vaccination at the post office Registration; Facilities in rural area of Telangana State
तेलंगणाच्या ग्रामीण भागात नुकतीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्या लोकांकडे स्मार्टफोन आहेत, पण ते कोविन अॅप योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम नाहीत अशा व्यक्तींना या सुविधेचा फायदा होणार आहे. तेलंगणातील 36 पोस्ट ऑफिस, 643 सब पोस्ट ऑफिस आणि 10 ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांची पंचायत होत होती. ज्यांच्याकडे फोन असला तरी नोंदणी करताना अनेकदा समस्या येत आहेत. ते आता जवळच्या पोस्ट ऑफिसची नोंदणीसाठी मदत घेऊ शकतात.
Corona vaccination at the post office Registration; Facilities in rural area of Telangana State
महत्त्वाच्या बातम्या
- जागतिक बँकेच्या शैक्षणिक सल्लागारपदी रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती
- जम्मू-कश्मीर! पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते त्रालचे नगराध्यक्ष राकेश पंडिता सोमनाथ यांचा मृत्यू
- श्रीनगरच्या ‘बडा घर’ गावाची अनुकरणीय प्रथा, हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही; नियम तोडणाऱ्याला टाकतात वाळीत
- सुनील गावस्कर म्हणतात…मी आणि सचिनपेक्षाही हा मोठा भारतीय आयकॉन
- फरार चोक्सी लवकरच गजाआड, चोक्सीच्या लंडनच्या वकिलांचे दावे डॉमिनिक कोर्टाने फेटाळले
- PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 3 दिवसांत होईल EPF क्लेम सेटेलमेंट, जाणून घ्या प्रोसेस
- SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आता बदलली ब्रांच उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ