• Download App
    Corona vaccination : कोरोनाविरोधी लसीचे १०० कोटी डोस देण्याचा टप्पा आज ओलांडण्याची शक्यता; मंगळवार अखेर दिले ९९ कोटी डोस । Corona vaccination: 100 crore dose of anti-corona vaccine likely to be surpassed today; 99 crore dose was finally given on Tuesday

    Corona vaccination : कोरोनाविरोधी लसीचे १०० कोटी डोस देण्याचा टप्पा आज ओलांडण्याची शक्यता; मंगळवार अखेर दिले ९९ कोटी डोस

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाच्या कोरोना विरोधातल्या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना लसीचे ९९ कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आज ऐतिहासिक १०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे.  Corona vaccination: 100 crore dose of anti-corona vaccine likely to be surpassed today; 99 crore dose was finally given on Tuesday

    देशात १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १ फेब्रुवारीला एक कोटी डोस देण्यात आले. १५ जून रोजी १५ कोटी डोस पूर्ण झाले तर ६ ऑगस्ट रोजी ५० कोटी डोस पूर्ण झाले. त्यानंतर १३ सप्टेंबरला ७५ कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाला तर मंगळवारी, १९ ऑक्टोबरला ९९ कोटीहून अधिक लोकांना डोस देण्यात आले आहेत.



    देशातील लसीकरणाच्या १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केलं जाणार आहे. लसीकरणाने १०० कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसं की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.
    गायक कैलास खेर म्हणाले की, “लसीबाबत देशातील अनेक नागरिकांमध्ये अजूनही निरक्षरता आणि चुकीची माहिती आहे. या थीम साँगच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

    देशात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या ही ३९ कोटी ५८ लाख ४१ हजार आहे तर ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांची संख्या ही १६ कोटी ८४ लाख ४८ हजार आहे. ६० वर्षावरील नागरिकांची संख्या ही १० कोटी ६० लाख आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ही एक कोटी तीन लाख इतकी आहे तर फ्रन्ट लाईन वर्कर्सची संख्या ही एक कोटी ८३ लाख आहे.

    Corona vaccination : 100 crore dose of anti-corona vaccine likely to be surpassed today; 99 crore dose was finally given on Tuesday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट