Corona Updates in India : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी देशाचा संघर्ष सुरू आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत आज पुन्हा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी देशात कोरोनाचे नवीन रुग्ण आणि मृत्यूंच्या बाबतीत किंचित घट झाली आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. गुरुवारी भारतात कोरोना संक्रमणामुळे जवळजवळ 4 हजार जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत अद्याप मोठी घसरण झालेली नाही, यामुळे अद्यापही चिंता कायम आहे. Corona Updates in India less than 3.5 lakh new patients registered in 24 Hours, death toll also low
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी देशाचा संघर्ष सुरू आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत आज पुन्हा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी देशात कोरोनाचे नवीन रुग्ण आणि मृत्यूंच्या बाबतीत किंचित घट झाली आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. गुरुवारी भारतात कोरोना संक्रमणामुळे जवळजवळ 4 हजार जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत अद्याप मोठी घसरण झालेली नाही, यामुळे अद्यापही चिंता कायम आहे. परंतु एकाच दिवसात देशात कोरोनाचे 3,43,288 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोना संसर्गामुळे 3999 जणांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा 2,62,239 वर पोहोचला आहे. या काळात 3 लाख 37 हजार 487 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 37,10,525 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण संसर्गाच्या 15.65 टक्के आहे, तर कोरोनातून बरे होण्याचा राष्ट्रीय दर सुधारून तो 83.26 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आकडेवारीनुसार आजारातून बरे होणार्या रुग्णांची संख्या 1 कोटी 97लाख 34 हजार 823 वर गेली आहे. तर मृत्यूचा दर 1.09 टक्के नोंदवण्यात आला आहे. आयसीएमआरनुसार 12 मेपर्यंत 30,94,48,585 नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी 18,6,594 नमुन्यांची चाचणी ही बुधवारी करण्यात आली होती.
10 राज्यांत संसर्ग अधिक, येथेच 72 टक्के नवे रुग्ण
दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांचा त्या 10 राज्यांत समावेश आहे, जेथे मागच्या 24 तासांत 3,62,727 नव्या रुग्णांपैकी 72.42 टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. या 10 राज्यांच्या यादीत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रातून दिवसभरात 46,781 नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर केरळमध्ये 43,529 नवीन आणि कर्नाटकात 39,998 नवीन रुग्ण आढळले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.09 टक्के आहे. नवीन मृत्यू प्रकरणांपैकी 74.30 टक्के 10 राज्यांत आहेत. नवीन रुग्णांपैकी 72.90 टक्के रुग्णही याच 10 राज्यांत आहेत.
कोरोनाची मे महिन्यातील आकडेवारी
13 मे 2021 : 3,43,288 नवीन रुग्ण आणि 3,999 मृत्यू
12 मे 2021 : 3,62,406 नवीन रुग्ण आणि 4,126 मृत्यू
11 मे 2021 : 348,529 नवीन रुग्ण आणि 4,200 मृत्यू
10 मे 2021 : 329,517 नवीन रुग्ण आणि 3,879 मृत्यू
9 मे 2021 : 366,499 नवीन रुग्ण आणि 3,748 मृत्यू
8 मे 2021 : 409,300 नवीन रुग्ण आणि 4,133 मृत्यू
7 मे 2021 : 401,326 नवीन रुग्ण आणि 4,194 मृत्यू
6 मे 2021 : 414,433 नवीन रुग्ण आणि 3,920 मृत्यू
5 मे 2021 : 412,618 नवीन रुग्ण आणि 3,982 मृत्यू
4 मे 2021 : 382,691 नवीन रुग्ण आणि 3,786 मृत्यू
3 मे 2021 : 355,828 नवीन रुग्ण आणि 3,438 मृत्यू
2 मे 2021 : 370,059 नवीन रुग्ण आणि 3,422 मृत्यू
1 मे 2021 : 392,562 नवीन रुग्ण आणि 3,688 मृत्यू
Corona Updates in India less than 3.5 lakh new patients registered in 24 Hours, death toll also low
महत्त्वाच्या बातम्या
- भारत कोरोनापेक्षा “गिधाडी पत्रकारितेचा” बळी ठरतोय; ऑस्ट्रेलियन मीडियाने पाडले पितळ उघडे
- इस्रायलच्या पायदळाला सज्ज राहण्याचे आदेश ; हवाई हल्ल्यानंतर गाझावर जमिनीवरूनही मारा
- ठाकरे- पवार सरकार झोपलेलेच; तिकडे मराठा आरक्षणाबाबत केंद्राची फेरविचार याचिका! राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचे प्रतिपादन
- यमनोत्री, गंगोत्रीची दारे सहा महिन्यांनंतर उघडणार
- ‘योगी जी, जिवंत राहिलो तर कोविड रूग्णांना पुन्हा सेवा देईन; मेलोच तर तुम्हाला भेटण्यासाठी पुनर्जन्म घेईन..’