Corona Updates : भारतात कोरोना संसर्गाने हाहाकार उडवला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. पहिल्यांदाच मागच्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 85 हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आता 13 लाखांच्याही पुढे गेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशात दररोज दीड लाखांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. Corona Updates In India Latest News
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाने हाहाकार उडवला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. पहिल्यांदाच मागच्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 85 हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आता 13 लाखांच्याही पुढे गेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशात दररोज दीड लाखांहून जास्त रुग्ण आढळत आहेत.
वर्ल्डोमीटरनुसार, मागच्या 24 तासांत 1.85 लाखांहून जास्त नवे रुग्ण आढळल्यानंतर भारतातील एकूण बाधितांचा आकडा हा 1.38 कोटींच्याही पुढे गेला आहे. तर 1000 हून जास्त मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंचा आकडा 1,72,115 वर गेला आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्यासोबतच कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरातही घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
देशातील कोरोनाची स्थिती
मागच्या 24 तासांतील नवे रुग्ण : 1,85,248
मागच्या 24 तासांतील एकूण मृत्यू : 1,026
मागच्या 24 तासांतील एकूण बरे झालेले : 82,231
भारतातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा : 13,871,321
भारतातील कोरोना झालेल्या मृत्यूंचा आकडा : 1,72,115
भारतात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या : 12,332,688
महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. देशातील सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रातच आढळत आहे. आता कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवस संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत पूर्ण राज्यात कलम 144 लागू असेल. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच घराबाहेर पडता येईल.
Corona Updates In India Latest News
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील कोणतीही कोरोनाविरोधी लस भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा
- मुंबईमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
- या सेवा व कार्यालयांना वगळले आहे अप्रत्यक्ष लॉकडाऊनमधून…
- कुंभमेळ्याची तुलना मरकझशी करणे अयोग्य, ते एका हॉलमध्ये राहिले, येथे २६ घाटांवर स्नानाच्या सुविधा , उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी टीकाकारांना सुनावले
- दीपाली चव्हाण यांचा मृत्यूनंतरही छळ, आरोपी सोडून कर्मचाऱ्यांवरच चौकशीचा वरवंटा