संसर्गाने देशातील बड्या राजकीय व्यक्तींनाही लक्ष्य केले आहे. या लाटेत गेल्या 10 दिवसांत देशातील 39 बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये तीन राज्यांचे मुख्यमंत्री, दोन राज्यांचे तीन उपमुख्यमंत्री आणि पाच केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. Corona to veterans 39 Chief Ministers of the country including three Chief Ministers, four Deputy Chief Ministers, six Union Ministers
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. अमेरिकेनंतर आता भारतात सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या एका आठवड्यापासून भारतात दररोज एक लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. तर अमेरिकेत दररोज सहा ते सात लाख लोक संक्रमित होत आहेत.
दरम्यान, संसर्गाने देशातील बड्या राजकीय व्यक्तींनाही लक्ष्य केले आहे. या लाटेत गेल्या 10 दिवसांत देशातील 39 बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये तीन राज्यांचे मुख्यमंत्री, दोन राज्यांचे तीन उपमुख्यमंत्री आणि पाच केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कोरोना
1. अरविंद केजरीवाल, दिल्ली (आता बरे झालेत)
2. नितीश कुमार, बिहार
3. बसवराज बोम्मई, कर्नाटक
4. रेणू देवी, उपमुख्यमंत्री, बिहार
5. तारकिशोर प्रसाद, उपमुख्यमंत्री, बिहार
6. मनोगर आजगावकर, उपमुख्यमंत्री, गोवा
7. दुष्यंत चौटाला, उपमुख्यमंत्री, हरियाणा
या केंद्रीय मंत्र्यांना संसर्ग
8. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
9. राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री
10. अजय भट्ट, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
11. महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (आता बरे)
12. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
13. अश्वनी चौबे, केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
भाजपच्या हे दिग्गज नेते कोरोनाच्या विळख्यात
14. जेपी नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष
15. मनोज तिवारी, खासदार
16. वरुण गांधी, खासदार
17. राधामोहन सिंग, उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी
18. खुशबू सुंदर, दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजप नेत्या
19. पंकजा मुंडे, भाजप नेत्या
काँग्रेस नेत्यांनाही लागण
20. रणदीप सुरजेवाला, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते, काँग्रेस
21. दीपेंद्र हुडा, काँग्रेस खासदार
महाराष्ट्राचे मंत्री आणि खासदार
22. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या खासदार
23. अरविंद सावत, शिवसेना खासदार, दक्षिण मुंबई
24. राजन विचारे, शिवसेना खासदार, ठाणे
25. एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र
26. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, महाराष्ट्र
27. वर्षा गायकवाड, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र
28. यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री, महाराष्ट्र
बिहारचे मंत्री आणि नेते
29. राजीव रंजन उपाख्य लल्लन सिंग, राष्ट्रीय अध्यक्ष, JDU
30. जीतन राम मांझी, माजी मुख्यमंत्री, बिहार
31. अशोक चौधरी, कॅबिनेट मंत्री, बिहार
32. सुनील कुमार, कॅबिनेट मंत्री, बिहार
पश्चिम बंगालमधील नेते
33. डेरेक ओब्रायन, टीएमसी नेते
34. बाबुल सुप्रियो, माजी केंद्रीय मंत्री आणि TMC नेते
35. कुणाल घोष, TMC प्रवक्ते
पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे
36. गोविंद सिंग राजपूत, महसूल आणि वाहतूक मंत्री, मध्य प्रदेश
37. टीएस देव सिंग, आरोग्य मंत्री, छत्तीसगड
38. राणा गुरजित सिंग, मंत्री पंजाब
समाजवादी पक्ष
39. डिंपल यादव, अखिलेश यादव यांच्या पत्नी