• Download App
    धारवाडच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा उद्रेक, १८२ विद्यार्थी कोरोनाबाधित|Corona spreed in Medical college of Dharwad

    धारवाडच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा उद्रेक, १८२ विद्यार्थी कोरोनाबाधित

    विशेष प्रतिनिधी

    बंगळूर – धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या आता १८२ वर गेली असून गुरुवारी हा आकडा केवळ ६६ होता. अजूनही या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.Corona spreed in Medical college of Dharwad

    या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही दिवसांपूर्वीच फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतरच कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले. या वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ४०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी १८२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.



    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे.कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या चाचण्यांनंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठीही हे नमुने पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

    कोरोना संसर्गाचा हा विस्फोट एखाद्या नवीन व्हेरिएंटमुळे झालेला नाही ना, हे तपासून पाहण्यात येणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

    Corona spreed in Medical college of Dharwad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!