• Download App
    हरिद्वारच्या कुंभमेळ्याद्वारे जणू कोरोनालाच आवतण, दोन दिवसांत हजारभर भाविकांना कोरोना |Corona patients rising in Kumbh mela

    हरिद्वारच्या कुंभमेळ्याद्वारे जणू कोरोनालाच आवतण, दोन दिवसांत हजारभर भाविकांना कोरोना

    विशेष प्रतिनिधी 

    हरिद्वार : कोरोनाकाळातही होत असलेल्या कुंभमेळ्यात कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते. प्रचंड गर्दीमुळे येथे कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या ४८ तासांत एक हजारहून भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.Corona patients rising in Kumbh mela

    प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतराच्या नियमाची पायमल्ली झाली. मोठे व प्रतिष्ठीत आखाडे शाही मिरवणूक काढत हर की पौडी घाटावर पोचत होते. यात कोणीही मास्क घातलेला नव्हता. मुख्य घाटांवर भाविकांची झुंबड उडाल्याने कोणतीही कारवाई करणे अशक्य झाले होते.



    कोरोनाची दुसरी लाट देशभरात पसरली असून ती अधिक घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी बिलकूल कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये काल कोरोनाचे एक हजार ९२५ लोक बाधित आढळले होते.

    हरिद्वारमध्ये दोन दिवसांत एक हजार लोकांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन शक्तीशाली आखाडे व संत-महात्म्यांच्या गटांशी चर्चा करीत आहे. त्यांनी आज शेवटचे स्नान करून हरिद्वार सोडावी, अशी विनंतीही करण्यात आली.

    Corona patients rising in Kumbh mela

     

    Related posts

    Congress : बिहार: काँग्रेसच्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची नावे; यादीत 5 महिला, 4 मुस्लिम, शकील अहमद कडवा येथून लढणार

    India Census 2027 : 10-30 नोव्हेंबरदरम्यान जनगणनेची प्री-टेस्ट; जूनमध्ये राजपत्र जारी, पुढील वर्षी सुरू होईल जनगणना

    Gujarat : गुजरातमध्ये नवे राज्य! सरकारमधील सर्व मंत्र्यांचा राजीनामा