करोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत काल पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशातील करोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “करोना अजून संपलेला नाही. गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार, जगात दररोज ९३ हजार ९७७ प्रकरणं समोर येत आहेत. अमेरिकेत १९ टक्के, रशियात १२.६ टक्के, चीनमध्ये ८.३ टक्के, दक्षिण कोरियात ८ टक्के आणि भारतात १ टक्का. प्रकरणे नोंदवली जात आहेत.” Corona is not over yet More patients reported in eight states including Maharashtra and Delhi Health Ministry
करोना प्रकरणांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, ‘’जगात आतापर्यंत सहा लाटा आल्या आहेत आणि आम्ही भारतातच तीन लाटा पाहिल्या आहेत.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी करोना आणि सीझनल इन्फ्लूएंझा या विषयावर बैठक झाली.
भारतात दररोज सरासरी ९६६ प्रकरणे नोंदवली जात आहेत –
केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले, “भारतात दररोज सरासरी ९६६ प्रकरणे नोंदवली जात आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्हीटी दर ०.०९ टक्के होता, जो आता १ टक्के झाला आहे. फेब्रुवारीमध्ये चाचण्यांची सरासरी संख्या १ लाख होती. ज्या नंतर कमी झाल्या. आता दररोज १ लाख चाचण्या केल्या जात आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल आणि राजस्थान या ९ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. या राज्यांना काय करावे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिथे जास्त केसेस आहेत तिथे जास्त चाचण्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा ताण वाढला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने देशातील सहा राज्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने या राज्यांमध्ये कोरोना चाचणी आणि ट्रॅकिंगवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यासोबतच लसीकरणही पाचपट वेगाने करण्यास सांगितले आहे. सरकारने कोविड-19 च्या परिस्थितीची चौकशी करण्यास आणि रोगाचे जलद आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यास सांगितले आहे.
Corona is not over yet More patients reported in eight states including Maharashtra and Delhi Health Ministry
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!
- माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा
- मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!
- राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!