• Download App
    कोरोनाचा कहर शेअर बाजारातील गुंतवणुकदारांच्या मुळावर, तब्बल नऊ लाख कोटी बुडाले|Corona impacts on share market badly

    कोरोनाचा कहर शेअर बाजारातील गुंतवणुकदारांच्या मुळावर, तब्बल नऊ लाख कोटी बुडाले

    विशेष प्रतिनिधी 

    मुबई- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेअर बाजारात सध्या जोरदार घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स 1700 अंकांनी खाली घसरून 48 हजारांच्या खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले. थोडक्यात कोरोनाची दुसरी लाट गुंतवणुकदारांच्या मुळावर उठू लागली आहे.Corona impacts on share market badly

    सध्या आशियाई शेअर बाजारामध्ये घट आहे. त्यामध्ये चीनचा शांघाय कंपोजिट, हाँगकाँगचा हेंगसेंग यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जपानचा निक्केई निर्देशांकही घसरणीसह व्यापार करत आहे. चौथ्या तिमाहीच्या निकालाआधी गुंतवणूकदार चिंताग्रस्त आहेत.



    सलग दोन तिमाहीत चांगल्या निकालानंतर चौथ्या तिमाहीत कोरोनाचा परिणाम दिसू शकतो, म्हणून गुंतवणूकदार गुंतवणूकीपूर्वी सावध आहेत.मागील वर्षी, कोरोनामुळे 23 मार्चपासून बाजारात घसरण झाली होती. त्यानंतर सेन्सेक्स आपल्या खालच्या स्तरावर 25,800 वर पोहोचला होता.

    खरेतर, तेथून रिकव्हर करुन या वर्षी 16 फेब्रुवारीमध्ये 52,500 च्या पोहोचला होता. परंतु मागील दिवसांपासून कोरोनामधील नवीन प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे त्यात घट होत आहे. आज बाजार दिवसातील सर्वात खालचा स्तर 47,779 पर्यंतही आला.

    Corona impacts on share market badly

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र