• Download App
    विमानप्रवाशांना कोरोनाची मोठी धास्ती, प्रवाशांची संख्या आली अवघ्या दोन लाखांवर Corona impacts on air traffic

    विमानप्रवाशांना कोरोनाची मोठी धास्ती, प्रवाशांची संख्या आली अवघ्या दोन लाखांवर

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. याचा विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. देशभरातील विमानतळावर दिवसभरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता कवळ दोन लाखांवर आली आहे. गेल्या पाच महिन्यातील हा सर्वात कमी प्रवासी संख्या आहे. Corona impacts on air traffic

    नेहमी गजबजलेल्या मुंबई विमानतळावर शुकशुकाट पसरला असून अनेक विमानात बोटावर मोजण्याएवढे प्रवासी आहेत. विमानतळावरुन दिवसाला केवळ ३०० उड्डाण होत आहेत. ३ ते ११ एप्रिल या दहा दिवसात विमानतळावर आलेल्या प्रवाशाची संख्या केवळ साडे तीन लाख आहे.



    दरम्यान, सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णवाढीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने टर्मिनल एक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व देशाअंतर्गत विमानांचे उड्डाण आता टर्मिनल टू म्हणजे आंतराष्ट्रीय विमानतळावरुन होणार आहे. २१ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे विमान प्रशासनाने सांगितले आहे.

    या विमानतळाचा वापर मुख्यतः आंतरदेशीय उड्डाणासाठी होतो. तसेच, नव्या निर्णयामुळे प्रवाशांना काही अडचणी येत असल्यास त्यांनी विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    Corona impacts on air traffic

    इतर बातम्या

    Related posts

    Election Commission : ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता उमेदवारांचे फोटो रंगीत होणार

    Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!

    Jaish-e-Mohammed, : ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदचे कुटुंब मारले गेल्याची जैशची कबुली; सशस्त्र दहशतवाद्यांच्या रॅलीत कमांडरचे वक्तव्य