• Download App
    कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून ३० दिवसांत मृत्यू झाल्यासच कोरोनाने मृत्यू झाल्याचे धरले जाणार ग्राह्य|Corona death will be presumed if death occured within 30 days of the corona test being positive.

    कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून ३० दिवसांत मृत्यू झाल्यासच कोरोनाने मृत्यू झाल्याचे धरले जाणार ग्राह्य

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून २५ दिवसांतच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो असे इंडीयन कौन्सील ऑफ मेडीकल रिसर्चच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून ३० दिवसांच्या आत मृत्यू झाल्यासच हा मृत्यू कोरोना मृत्यू म्हणून ग्राह्य धरला जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोना मृत्यूच्या नियमावलीमध्ये म्हटले आहे.Corona death will be presumed if death occured within 30 days of the corona test being positive.

    या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविड मृत्यूची भरपाई मागणाºया एका प्रकरणात केंद्र सरकारने म्हटले आहे की आरटीपीसीआर, रॅपिड अँटीजेन किंवा मॉलेक्युलर चाचणीद्वारे निदान केले गेले असल्यास किंवा रुग्णालयात वैद्यकीयदृष्ट्या कोरोनाचे रुग्ण म्हणून निर्धारित केले गेले असेल तेच मृत्यू कोरोनाने मृत्यू झाल्याचे मानले जाणार आहे.



    अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास २५ दिवसांच्या आतच मृत्यू होतो. त्यामुळे ाचणीच्या तारखेपासून किंवा वैद्यकीयदृष्ट्या निर्धारित केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत होणाºया मृत्यूंनाच कोरोनाने झालेला मृत्यू मानले जाईल. एखाद्या रुग्णाचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाल असला तरी चाचणी किंवा वैद्यकीय निदान यांचा विचार केला जाईल.

    एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घरी झाला असला तरी जन्म-मृत्यू नोंदणीमध्ये कलम १० अंतर्गत नोंदणी प्राधीकरणाने कोरोना मृत्यू असे कारण दर्शविले असले तरी त्याला अधिकृत कोरोना मृत्यू मानले जाईल. मात्र, विषबाधा, आत्महत्या, हत्या, अपघात इत्यादींमुळे होणाऱ्या मृत्यूंना कोविड -19 मृत्यू मानले जाणार नाही. त्या व्यक्तीला संसर्ग झाला असला तरी त्याचे कारण कोरोना असे मानले जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.

    कोरोनाने मृत्यू झाला असल्या पीडितांच्या कुटुंबांना चार लाख रुपये मदत मिळते. याबाबते वकील गौरव कुमार बन्सल आणि रीपक कंसल यांनी एका रुग्णाला मदतीसाठी केलेल्या स्वतंत्र याचिकेत या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यास सांगितले आहे.

    Corona death will be presumed if death occured within 30 days of the corona test being positive.

    महत्त्वाच्या बातम्या.

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!