Corona Crisis in India : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. बुधवारी देशात 4 लाखांच्याही पुढे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात देशभरात एकूण 4.12 लाख नवीन रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. वेळच्या सर्वोच्च आकडेवारीपेक्षा हा आकडा 10 हजारांहून अधिक आहे. याशिवाय बुधवारी सर्वाधिक 3980 मृत्यूंची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. Corona Crisis In India Latest Updates 4.13 lakh patients in Just 24 hours, 3980 deaths
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. बुधवारी देशात 4 लाखांच्याही पुढे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात देशभरात एकूण 4.13 लाख नवीन रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. वेळच्या सर्वोच्च आकडेवारीपेक्षा हा आकडा 10 हजारांहून अधिक आहे. याशिवाय बुधवारी सर्वाधिक 3980 मृत्यूंची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे.
देशातील कोरोनाची सद्य:स्थिती
24 तासांत आढळलेले नवे रुग्ण : 4,12,262
24 तासांत बरे झालेले रुग्ण : 3,29,113
24 तासांत झालेले मृत्यू : 3980
एकूण रुग्णसंख्या : 2,10,77,410
एकूण बरे झालेले : 1,72,80,844
एकूण मृत्यू : 23,01,68
एकूण सक्रिय रुग्णसंख्या : 35,66,398
एकूण लसीकरण : 16,25,13,339
बुधवारी देशात कोरोना संसर्गाचे एकूण 4,12,262 रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी आहे. दुसऱ्यांदा एका दिवसातील रुग्णसंख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी 30 एप्रिल रोजी देशात 4,02,351 रुग्णांची नोंद झाली होती.
कर्नाटकात आता महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कर्नाटकात बुधवारी सुमारे 50 हजार रुग्ण आढळले, त्यापैकी एकट्या बंगळुरूमध्ये सुमारे 25 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी महाराष्ट्रात 920, यूपीमध्ये 357, कर्नाटकात 346, पंजाबमध्ये 186, हरियाणामध्ये 181, तामिळनाडूमध्ये 167 मृत्यूंची नोंद झाली.
महाराष्ट्रात एका दिवसात 57 हजारांहून अधिक रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम आहे. राज्यातील संसर्ग आणि मृत्यूचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. आरोग्य विभागानुसार, गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 57,640 रुग्ण आढळले आहेत, तर 920 जणांचा बळी गेला आहे. एकट्या मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3879 रुग्ण आढळले, तर 77 जणांचा मृत्यू झाला. याच काळात 3,686 जणांनी कोरोनावर मातदेखील केली आहे.
Corona Crisis In India Latest Updates 4.13 lakh patients in Just 24 hours, 3980 deaths
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार, १ शरण
- पवार आजी पुन्हा पुण्याच्या रस्त्यावर; पोट भरण्यासाठी लाठी-काठीचे खेळ
- राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण; दुपारपर्यंत उकाडा , सायंकाळी बरसणार
- शपथ घेताच ममतांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा, सर्वांना मोफत लस देण्याची मागणी
- रामायणातील रावण अरविंद त्रिवेदी यांची प्रकृती ठणठणीत, निधनाविषयीची अफवा पसरल्याने सारे हैराण