• Download App
    Corona Cases Updates : देशात कोरेानामुळे हाहाकार! 24 तासांत पहिल्यांदाच 4 हजारपेक्षा जास्त मृत्यू, चौथ्यांदा नवीन रुग्णसंख्या 4 लाखांच्या पुढे । Corona Cases Updates in India More than 4 thousand deaths first time in 24 hours

    Corona Cases Updates : देशात कोरोनामुळे हाहाकार! 24 तासांत पहिल्यांदाच 4 हजारपेक्षा जास्त मृत्यू, चौथ्यांदा नवीन रुग्णसंख्या 4 लाखांच्या पुढे

    Corona Cases Updates : कोरेाना महामारीच्या भयावह दुसऱ्या लाटेत देशात दररोज केवळ रुग्णच वाढत नसून मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. एकाच दिवसात भारतात प्रथमच चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याच वेळी चौथ्यांदा आणि सलग तिसर्‍या दिवशी 4 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 401,078 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच काळात 4187 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान, कोरोनावर 3,18,609 जणांनी मातही केली आहे. Corona Cases Updates in India More than 4 thousand deaths first time in 24 hours


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरेाना महामारीच्या भयावह दुसऱ्या लाटेत देशात दररोज केवळ रुग्णच वाढत नसून मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. एकाच दिवसात भारतात प्रथमच चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याच वेळी चौथ्यांदा आणि सलग तिसर्‍या दिवशी 4 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 401,078 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच काळात 4187 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान, कोरोनावर 3,18,609 जणांनी मातही केली आहे.

    7 मेपर्यंत देशभरात 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 कोरोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. आदल्या दिवशी 22 लाख 97 हजार 257 डोस देण्यात आले. त्याचबरोबर 29 कोटी 67 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या, याचा पॉझिटिव्हिटी रेट 21 टक्क्यांहून अधिक आहे.

    कोरोनाची देशातील सद्य:स्थिती

    एकूण कोरोना रुग्णसंख्या – 2 कोटी 18 लाख 92 हजार 676
    एकूण बरे झालेले – 1 कोटी 79 लाख 30 हजार 960
    एकूण सक्रिय रुग्णसंख्या – 37 लाख 23 हजार 446
    एकूण मृत्यूंची संख्या – 2 लाख 38 हजार 270

    महाराष्ट्रात सर्वात चिंताजनक परिस्थिती

    शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 54,022 नवीन रुग्ण दाखल झाल्यानंतर एकूण रुग्णांचा आकडा 49 लाख 96 हजार 758 वर गेला. 24 तासांत 898 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 74,413 जणांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसआधी राज्यात 62,194 रुग्ण नोंदले गेले. आणखी 37,386 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून आतापर्यंत 42 लाख 65 हजार 326 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6,54,788 आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 2,68,912 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. मुंबईत कोरोनाचे 3040 नवीन रुग्ण आढळले आणि 71 रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शहरांपेक्षा ग्रामीण भागातून संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

    देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 1.09 टक्के आहे, तर बरे होण्याचा दर 82 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सक्रिय रुग्णांचा दर 17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या बाबत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण लोकांच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.

    Corona Cases Updates in India More than 4 thousand deaths first time in 24 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य