Corona 2nd Wave in India : देशात कोरोना संसर्गात पुन्हा एकदा सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे तब्बल 81 हजार रुग्ण आढळले आहेत. हा या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मागच्या 24 तासांत तब्बल 469 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. Corona 2nd Wave in India 81,000 patients killed in last 24 hours, 469 dead
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गात पुन्हा एकदा सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे तब्बल 81 हजार रुग्ण आढळले आहेत. हा या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मागच्या 24 तासांत तब्बल 469 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याचदरम्यान आता देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडाही 1.63 लाखांवर गेला आहे. दुसरीकडे, लसीकरणाबाबत बोलायचे झाल्यास आतापर्यंत भारतात साडे सहा कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे.
मागच्या 24 तासांत आढळलेले रुग्ण : 81,466
24 तासांतील मृत्यू : 469
24 तासांत बरे झालेल्यांची संख्या : 50,356
कोरोनाचे आतापर्यंत एकूण रुग्ण : 1,23,03,131
कोरोनातून आतापर्यंत बरे झालेले : 1,15,25,039
देशातील सक्रिय रुग्णसंख्या : 6,14,696
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1,63,396
महाराष्ट्रासह दिल्लीतही चिंतेचे वातावरण
होळी सणाच्या आधीपासून अनेक राज्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. परंतु आता होळीनंतर तर परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. येथे एका दिवसात 43 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत कोणत्याही राज्यात एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळलेले नाहीत.
फक्त पुणे, मुंबईतच 8-8 हजार रुग्ण आढळताहेत. महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीतही कोरोनामुळे परिस्थिती चिघळत चालली आहे. दिल्लीत एका दिवसात 2790 कोरोना रुग्णांची नोंद झाली. हा या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ यासारख्या राज्यांतही एका दिवसात विक्रमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वात जास्त 80 टक्के रुग्ण 8 राज्यांतील आहेत. यातही महाराष्ट्रातील आकडा सर्वात जास्त आहे.
Corona 2nd Wave in India 81,000 patients killed in last 24 hours, 469 dead
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशानंतर गुजरातेतही लव्ह जिहाद विधयेक मंजूर, दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
- उदयनिधी स्टॅलिन यांचे वादग्रस्त वक्तव्य; स्वराज-जेटलींचा मोदींच्या छळामुळे मृत्यू, जेटली-स्वराज कन्यांनी केला पलटवार
- सचिन वाझे केस : वो कौन थी? चा अखेर उलगडा ; मीरा रोड येथून एनआयएच्या कारवाईत बुरखाधारी महिला ताब्यात
- ISRO Recruitment 2021 : इस्रोमध्ये ‘या’ पदांवर भरती, तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, 21 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत
- नंदिग्रामच्या महासंग्रामात ‘ड्रामा-अॅक्शन-इमोशन’ ; दिवसभर वार-पलटवार ; ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी ‘आमने – सामने’