• Download App
    द काश्मीर फाईल्सवर आयएएस अधिकाºयाचे वादग्रस्त वक्तव्य, मुस्लिमांच्या हत्यांवरही चित्रपट बनवा म्हणाले, सरकारने बजावली नोटीस|Controversial IAS officer's statement on The Kashmir Files says film should also be made on Muslim killings, govt issues notice

    द काश्मीर फाईल्सवर आयएएस अधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य, मुस्लिमांच्या हत्यांवरही चित्रपट बनवा म्हणाले, सरकारने बजावली नोटीस

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ: द काश्मीर फाईल्सवरून विविध राज्यांत झालेल्या मुस्लिमांच्या हत्यांवरही चित्रपट बनवा असे वादग्रस्त ट्विट करणाºया आयएएस अधिकाऱ्याला राज्य सरकारने नोटीस बजावणार आहे.मध्य प्रदेश सरकार बुधवारी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरील वादग्रस्त ट्विटबद्दल आयएएस अधिकारी नियाज खान यांच्यावर कारवाई करणार आहे.Controversial IAS officer’s statement on The Kashmir Files says film should also be made on Muslim killings, govt issues notice

    राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे ट्विट सरकारी अधिकाºयांसाठी ठरवलेल्या मयार्दा ओलांडत आहेत आणि त्यांचे उल्लंघन करत आहेत. मी नियाज खान यांचे ट्विट्स पाहिले आहेत. हे एक गंभीर प्रकरण आहे. सरकारी अधिकाऱ्यांना घालून दिलेल्या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन ते करत आहेत. राज्य सरकार त्यांना एक कारणे-दाखवा नोटीस पाठवेल आणि त्यांना उत्तर मागवलं जाईल.



    आयएएस नियाज खान हे मध्य प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) उपसचिव आहेत. त्यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल गेल्या आठवड्यात काही ट्विट्स केले होते. तसेच त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना वेगवेगळ्या राज्यात मोठ्या संख्येने होणाऱ्या मुस्लिमांच्या हत्यांवरही चित्रपट बनवण्याचे आवाहन केलं होतं.

    काश्मीर फाइल्स ब्राह्मणांच्या वेदना दाखवते. त्यांना काश्मीरमध्ये सर्व सन्मानाने सुरक्षितपणे राहू दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर निर्मात्यांनी अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिमांच्या होणाऱ्या हत्या दाखवण्यासाठीही एक चित्रपट बनवला पाहिजे. मुस्लिम हे कीटक नसून मानव आणि देशाचे नागरिक आहेत,

    असं त्यांनी लिहिलं होतं. पुढे ते म्हणाले होते की, मुस्लिमांच्या हत्याकांडावर प्रकाश टाकणारं एक पुस्तक लिहिण्याचं त्यांच्या मनात आहे. वेगवेगळ्या प्रसंगी मुस्लिमांचे हत्याकांड घडलंय. आणि ते दाखवण्यासाठी एक पुस्तक लिहिण्याचा ते विचार करत आहोत, जेणेकरून अल्पसंख्याकांच्या वेदना भारतीयांसमोर मांडता येतील.

    Controversial IAS officer’s statement on The Kashmir Files says film should also be made on Muslim killings, govt issues notice

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला