• Download App
    'अयोध्येतल्या राम मंदिरासाठी शिवसैनिकांचं योगदान' ; मिलिंद नार्वेकरांनी पोस्ट केला बाबरी मशिदीचा फोटो । 'Contribution of Shiv Sainiks for Ram Temple in Ayodhya'; Photo of Babri Masjid posted by Milind Narvekar

    ‘अयोध्येतल्या राम मंदिरासाठी शिवसैनिकांचं योगदान’ ; मिलिंद नार्वेकरांनी पोस्ट केला बाबरी मशिदीचा फोटो

    • अयोध्येत आजपासून 29 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी बाबरी मशिद पाडण्यात आली होती. या प्रकरणी अनेक कारसेवक, विश्वहिंदू परिषद, भाजप कार्यकर्ते, शिवसैनिक यांचा सहभाग होता. बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यावर या प्रकरणी खटलाही भरवण्यात आला होता. 6 डिसेंबर 1992 ला रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, अब भी जिसका खून न खौला, खून नहीं वो पानी है जो राम के काम न आये वो बेकार जवानी है अशा घोषणा देत बाबरी मशिद पाडण्यात आली होती.
    • देशात कोर्टात सर्वात जास्त काळ चाललेलं हे प्रकरण आहे. याप्रकरणी 2019 ला निकाल लागला. आता या जागी प्रभू रामचंद्रांचं मंदिर आकार घेतं आहे. ‘Contribution of Shiv Sainiks for Ram Temple in Ayodhya’; Photo of Babri Masjid posted by Milind Narvekar

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज ट्विट केलं आहे .त्यांच हे ट्विट चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. बाबरी मशिद पाडण्यात आली तो आजचाच दिवस. या दिवसाचं औचित्य साधत मिलिंद नार्वेकरांनी बाबरी मशिद पाडण्यात आली तो फोटो ट्विट केला आहे.

    काय म्हटलं मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटमध्ये?

    • अयोध्येतील राम मंदिर उभारलं जावं म्हणून शिवसैनिकांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाला कोटी कोटी नमन. असं म्हणत मिलिंद नार्वेकरांनी बाबरी मशिद पाडण्यात आली तो फोटो ट्विट केला आहे.
    • बाबरी मशिद ही जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा सार्थ अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे कायमच म्हणत असत. या प्रकरणी त्यांच्यावर खटलाही भरला होता.
    • २०१९ नंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात काडीमोड झाला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही हिंदुत्व आम्ही विसरलो नाही .
    • आता मिलिंद नार्वेकर यांनी हा फोटो ट्विट केला आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    ‘Contribution of Shiv Sainiks for Ram Temple in Ayodhya’; Photo of Babri Masjid posted by Milind Narvekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार