प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोल मध्ये काँग्रेसचे मोराल बूस्टिंग जरूर झाले आहे, पण काँग्रेसची उडी मात्र बहुमताच्या आकडेच्या आतच पडताना दिसत आहे. भाजपला सत्ता गमवावी लागेल हे सर्वच एक्झिट पोलचे निष्कर्ष आहेत, पण काँग्रेसच्या आकडेवारी बाबत मात्र थोडेसे मतभेद दिसत असून एबीपी, टीव्ही 9, आर. भारत या वृत्तवाहिन्यांनी काँग्रेसला बहुमत मिळणार नाही, पण तो सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा निष्कर्ष काढला आहे.Congress’s “Morale Boosting” from Karnataka Exit Poll, But Jump Within Majority Number!!
भाजपला सर्व एक्झिट पोल मध्ये 80 ते 85 जागांवर समाधान मानावे लागल्याने सत्ता गमवावी लागेल हा निष्कर्ष समान आहे. काँग्रेसला 90 ते 115 जागांपर्यंत उडी घेता येईल असा एबीपीचा अंदाज आहे. टीव्ही 9 चा अंदाज काँग्रेस 120 पर्यंत जाण्याचा आहे. या सर्व एक्झिट पोल मधून जेडीएसला 20 ते 25 जागांच्या पलीकडे जागा मिळणार नसल्याचाही निष्कर्ष समान आहे.
या सर्व एक्झिट पोलचा अंदाज घेतला की काँग्रेसचे मनोधैर्य उंचावल्याचे दिसत आहे. पण बहुमतासाठी मात्र त्याला जेडीएसच्या नागदुर्या काढाव्या लागणार असल्याची चिन्हे आहेत.
अर्थातच काँग्रेससाठी एक वेगळी गुड न्यूज आहे ती म्हणजे विरोधकांचे राष्ट्रीय पातळीवर ऐक्य झाले तर काँग्रेसचा त्यामध्ये वरचष्मा राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील काँग्रेसला महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्याशी जागा वाटपाचा संघर्ष करताना उंचावलेल्या मनोधैर्याचा फायदा होणार आहे.
अर्थात कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 13 मे रोजी आहेत. त्यापूर्वी महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातला निकाल लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सर्वस्वी कर्नाटक मधल्या निकालांवर अवलंबून नाही. कर्नाटक मधले निकाल काँग्रेसच्या बाजूने अनुकूल लागले तरी महाराष्ट्रात जर सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सरकारला शिंदे – फडणवीस सरकारला धोका उत्पन्न होणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे मनोधैर्य खचू शकते. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्या आमदारांमधली चलबिचल वाढू शकते.
या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे एक्झिट पोल आणि त्यानंतरचे निकाल जर समान लागले तर काँग्रेसचे मनोधैर्य जरी उंचावले तरी त्या पक्षाची महाराष्ट्रातील बार्गेनिंग पॉवर किती वाढेल??, याविषयी शंका आहेच.
Congress’s “Morale Boosting” from Karnataka Exit Poll, But Jump Within Majority Number!!
महत्वाच्या बातम्या
- माढ्यात राष्ट्रवादीला फिरवायचीय भाकरी; पण जुन्याच भाकरीला शेक देण्याची तयारी!!
- महाविकास आघाडीत मतभेदांचे पेटले वणवे; स्वतःचे राज्य सोडून ते विझवायला उद्या “बिहारी बंब” इकडे!!
- ठिणगीतून वणवा; पवारांबरोबर कोणीही नव्हते तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत आलो; संजय राऊत यांचे थेट प्रत्युत्तर
- कर्नाटकात मतदान सुरूअसतानाच काँग्रेस नेत्यांचे आकड्यांचे उंच उंच दावे; भाजप नेत्यांचे मात्र सावध पवित्रे!!