प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खीरीकडे निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने स्थानबद्ध करून सीतापूरच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. त्यांच्या सुटकेसाठी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल रात्रभर या गेस्ट हाऊस समोर ठिय्या मारून आंदोलन केले. गेस्ट हाऊसच्या आवारात आणि रस्त्यावर पथार्या मांडल्या.Congress supporters stage protest, demand “release of Priyanka Gandhi Vadra
हे आंदोलन पहाटे देखील सुरू राहिले असून प्रियांका गांधी यांची सुटका होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते येथून हलणार नाहीत. उलट कार्यकर्त्यांची संख्या अधिक वाढेल, असा इशारा उत्तर प्रदेश काँग्रेसने दिला आहे.
– प्रियांका गांधी म्हणाल्यात…
हा देश शेतकऱ्यांचा आहे. भाजपची जहागीरदारी नाही. पोलिसांची मला रोखण्याची हिंमतच कशी होते? मी काही अपराध करायला लखीमपूर खीरीकडे चालले नव्हते. त्यांनी मला अडवले. हे मी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारचे वाभाडे काढले होते.
पोलिसांवरही त्यांनी आगपाखड केली. मला अडवण्याची किंवा प्रतिबंध करण्याची ऑर्डर पोलिसांकडे नव्हती तरीही त्यांची हिंमत कशी झाली? मी पोलिसांना ऑर्डर मागितली तर त्यांनी आपली तोंडे लपवली. जर त्यांच्याकडे ऑर्डर होती तर त्यांना तोंड लपवण्याची काय गरज होती?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला होता.
हा देश शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांनी तो सुजलाम-सुफलाम केला आहे. ही भाजपची जहागीरदारी नाही. त्यांना शेतकऱ्यांना संपवायचे आहे. इथे मुठभर भांडवलदारांचे राज्य आणायचे आहे. पण या देशातला शेतकरी आणि आम्ही हे घडू देणार नाही, असा इशाराही प्रियांका गांधी यांनी दिला.
प्रियांका गांधी यांनी आपल्या गाडीमध्ये एक व्हिडिओ काढून तो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. यामध्ये त्यांनी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्याची माहिती दिली आहे आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला आहे.
Congress supporters stage protest, demand “release of Priyanka Gandhi Vadra
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले शशी थरूर, आर्यनबद्दल म्हणाले – सहानुभूती ठेवा!
- माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी
- नवरात्रोत्सव २०२१ : रावणदहनाला प्रेक्षक बोलवू नका, लोकांना लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करा, वाचा… गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
- Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार
- कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई : 30 दिवसांच्या आत पीडितांच्या कुटुंबीयांना 50 हजार देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश