• Download App
    नवज्योत सिंग सिध्दू यांचे आता आपवर डोरे, कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली शिस्तभंगाच्या कारवाईची मागणीCongress leaders demand disciplinary action against Navjot Singh Sidhu

    नवज्योत सिंग सिध्दू यांचे आता आपवर डोरे, कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे माझे धाकटे भाऊ आणि प्रामाणिक आहे. भगवंत मान यांनी माफियांविरुद्ध काहीतरी करण्याची गरज आहे, असे म्हणत नवज्योत सिंग सिध्दू यांनी आपवर डोरे टाकण्यास सुरूवात केली आहे. मात्र, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.Congress leaders demand disciplinary action against Navjot Singh Sidhu


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे माझे धाकटे भाऊ आणि प्रामाणिक आहे. भगवंत मान यांनी माफियांविरुद्ध काहीतरी करण्याची गरज आहे, असे म्हणत नवज्योत सिंग सिध्दू यांनी आपवर डोरे टाकण्यास सुरूवात केली आहे. मात्र, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.

    पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पंजाब प्रभारी हरीश चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि सतत वक्तव्य केल्याबद्दल नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.



    आम्ही काँग्रेस हायकमांडला नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात अनुशासनहीनतेबाबत पत्र लिहिले आहे. आम्ही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण मागावे अशी शिफारस केली आहे, असे हरीश चौधरी यांनी म्हटले आहे.

    गेल्या काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले होते. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी माफियांविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे पंजाबच्या जनतेने बदलाची संधी दिल्याचे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते. ते म्हणाले होते की, माझा लढाही माफियांविरुद्ध आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे माझे धाकटे भाऊ आणि प्रामाणिक आहे. भगवंत मान यांनी माफियांविरुद्ध काहीतरी करण्याची गरज आहे.

    Congress leaders demand disciplinary action against Navjot Singh Sidhu

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!