• Download App
    कुस्तीगीर आंदोलनात प्रियांका गांधी, दीपेंद्र हुड्डासह काँग्रेस नेते सामील; आंदोलनाला राजकीय रंग आणि फंडिंगवर प्रश्नचिन्ह!! Congress leaders along with Priyanka Gandhi, Dipendra Hooda joined the Kustigir movement

    कुस्तीगीर आंदोलनात प्रियांका गांधी, दीपेंद्र हुड्डासह काँग्रेस नेते सामील; आंदोलनाला राजकीय रंग आणि फंडिंगवर प्रश्नचिन्ह!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रशभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीगीरांनी दिल्लीतल्या जंतर मंतर चालवलेल्या आंदोलनात प्रियांका गांधी, दिपेंद्र हुड्डा यांच्यासह काँग्रेस नेते आले आणि त्याला जो राजकीय रंग आला, त्यामुळे आंदोलनकर्ते कुस्तीगीर अडचणीत आले आहेत. साक्षी मलिकला पुढे येऊन आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करत नसते, असे जाहीर सांगावे लागत आहे. Congress leaders along with Priyanka Gandhi, Dipendra Hooda joined the Kustigir movement

    त्याचवेळी कुस्तीगीर आंदोलनाला फंडिंग कोण करते आहे?? कारण तिथे आता महागड्या गाद्या, कुलर, कुस्तीगीरांचे जेवण यावरच्या खर्चाचा आकडाच बाहेर आला आहे आणि तो प्रत्येक दिवसाचा 5 लाख रुपये आहे. गाद्या, तंबूंचे दिवसाचे भाडे 27000 आहे.

    कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन वाढवताना ज्या पद्धतीने मोठमोठे तंबू, कुलर, एसी एकापाठोपाठ एक आले, तसेच जंतर- मंतरवर चित्र दिसू लागल्याने कुस्तीगीरांच्या आंदोलनासाठी नेमके फंडिंग कोण करत आहे??, या विषयी ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    त्यातच ज्यांच्यावर कुस्तीगिरांनी गंभीर आरोप केले आहेत, त्या ब्रजभूषण सिंह यांनी राजीनाम्याची तयारी दाखवतानाच फक्त एकाच परिवारातले आणि एकाच आखाड्यातली कुस्तीगीर आपल्या विरुद्ध आंदोलन करत असल्यावर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र, मणिपूर, आसाम, आंध्र या राज्यांमध्ये पदक विजेते कुस्तीगीर आंदोलनात का नाही?? फक्त एकाच आखाड्यातल्या आणि एकाच राज्यातल्या म्हणजे हरियाणातल्या कुस्तीगिरांवर अन्याय झाला आहे का??, असा खोचक सवाल ब्रशभूषण सिंह यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर प्रियांका गांधी आणि दिपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीमुळे कुस्तीगरांच्या आंदोलनामध्ये नेमके कोण सामील आहे हे सिद्ध झाले, असा आरोपही त्यांनी केला.

    कुस्तीगिरांच्या आंदोलनाला राजकीय रंग चढत असल्याचे पाहून ऑलिंपिक विजेती कुस्तीगीर साक्षी मलिक हिला पुढे येऊन आम्ही सर्व खेळाडू कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करत नसल्याचा खुलासा करावा लागला आहे. पण या खुलाशानंतरही आंदोलनाला लागलेला राजकीय रंग फिका पडलेला नाही.

    Congress leaders along with Priyanka Gandhi, Dipendra Hooda joined the Kustigir movement

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!