लोकसभेतील काँग्रेसच्या नेत्याला निलंबनाचा आदेश मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना काल पंतप्रधान मोदींवर चुकीच्या पद्धतीने केलेली टीका आणि त्या अगोदर मंत्र्यांच्याही भाषणादरम्यान वारंवार व्यत्यय आणल्याच्या आरोपावरून सभागृहातून निलंबित करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेसच्या नेत्याला निलंबनाचा आदेश मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवले गेले आहे. Congress leader Adhir Ranjan Chaudharys suspension from the Lok Sabha
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात ठराव मांडताना सांगितले की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी प्रत्येक वेळी देशाची आणि सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी आम्ही माफीची मागणी केली होती, मात्र त्यांनी माफी मागितली नाही. यानंतर त्यांच्या विरोधात एक ठराव मांडण्यात आला जो मान्य करण्यात आला. अधीर रंजन चौधरी यांचे वर्तन सदनाशी सुसंगत नसल्याचे सभापती म्हणाले.
निलंबनानंतर अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ‘’आजही मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान ‘नीरव’ राहिल्यामुळे मला सभागृहातून बाहेर पडावे लागले, त्यामुळे नवा ‘नीरव मोदी’ पाहण्याचा काय उपयोग आहे, असे मला वाटले. पंतप्रधान मोदी म्हणतात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, मग ते काँग्रेसला कशाला घाबरतात,’’
खरं तर, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, अविश्वास ठरावाच्या ताकदीने पंतप्रधानांना आज संसदेत आणले आहे. या अविश्वास प्रस्तावाचा आमच्यापैकी कोणीही विचार करत नव्हता. मोदींनी संसदेत येऊन मणिपूरच्या मुद्द्यावर बोलावे, अशी आमची मागणी होती.
काय म्हणाले होते अधीर रंजन चौधरी –
अधीर रंजन चौधरी मोदींबद्दल बोलताना म्हणाले की, धृतराष्ट्र आंधळा होता तेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते, आजही राजा आंधळाच आहे, मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपाने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधी दिली नाही.
अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला. त्याचवेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात सांगितले की, पंतप्रधान हे उच्चाधिकारी आहेत. हे बोलणे थांबवले पाहिजे आणि त्यांनी(अधीर रंजन चौधरी) माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप मान्य करता येणार नाहीत. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, हे रेकॉर्डबाहेर काढण्यात आले आहे.
Congress leader Adhir Ranjan Chaudharys suspension from the Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??