• Download App
    निवडणुकीअगोदरच कॉँग्रेसने उत्तर प्रदेशात मान्य केला पराभव, प्रियंका गांधी यांचे समाजवादी पक्षासोबत सत्तेचे खयाली पुलाव|Congress admits defeat in Uttar Pradesh ahead of polls, Priyanka Gandhi's dream of power with Samajwadi Party

    निवडणुकीअगोदरच कॉँग्रेसने उत्तर प्रदेशात मान्य केला पराभव, प्रियंका गांधी यांचे समाजवादी पक्षासोबत सत्तेचे खयाली पुलाव

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना अद्याप महिनाभर अवकाश आहे. परंतु, त्यापूर्वीच कॉँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. मात्र, समाजवादी पक्षासोबत आपल्याला सत्ता मिळेल असे खयाली पुलाव प्रियंका गांधी यांनी सुरू केले आहेत.Congress admits defeat in Uttar Pradesh ahead of polls, Priyanka Gandhi’s dream of power with Samajwadi Party

    काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी समाजवादी पक्षासोबत निवडणुकोत्तर युतीची शक्यता मान्य केली आहे. अखिलेश यादव यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही जागा कमी पडल्या तर काँग्रेसला पाठिंबा देण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे म्हटले आहे यासाठी एकच अट असेल की काँग्रेसने तरुण आणि महिलांसाठी जो अजेंडा तयार केला आहे तो पूर्ण झाला पाहिजे.



    प्रियांका गांधी यांनी शनिवारी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष निवडणुकीनंतर सपासोबत युती करण्यास तयार आहे. प्रियांका गांधींना विचारण्यात आले की, जर अशी वेळ आली की सर्वांनी एकत्र यावे,

    तर तुम्ही अखिलेश यांना पाठिंबा द्याल का? यावर प्रियांका गांधी म्हणाल्या, अशी परिस्थिती उद्भवली तर मला वाटत नाही की काही अडचण येईल. फक्त माझ्या तरुणाईचा, महिलांचा अजेंडा राबविला गेला पाहिजे.

    मी विचारधारेची लढाई लढत आहे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे हे ध्येय आहे. आम्ही लढत आहोत. सत्ता मिळेल की नाही? मी हे भाकीत करू शकत नाही. परंतु, मला सांगायचे आहे की आमचा संघर्ष महिला आणि तरुणांसाठी आहे. त्यांच्याशी कुणीतरी बोलायला हवं. हे केवळ सत्तेत येण्याचे साधन नाही. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या गरीब आणि दुर्बल महिलांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे.

    Congress admits defeat in Uttar Pradesh ahead of polls, Priyanka Gandhi’s dream of power with Samajwadi Party

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये