वृत्तसंस्था
बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री सुधाकर यांच्या खात्यातून सीडी प्रकरणातील युवतीला मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग झाल्याचा संशय आहे. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने सुधाकर यांना नोटीस जारी करून चौकशीला हजर राहण्याचा आदेश बजावला आहे. Cong. Leader sudhakar gets notice from SIT
सीडी प्रकरणातील युवतीची चौकशी केल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत. सुधाकर गेले सहा महिने या युवतीच्या संपर्कात होते.
युवतीच्या मोबाईलवरून सुधाकर यांना सर्वाधिक कॉल गेल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याचे समजते. सुधाकर हे २००८ मध्ये येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१३ व २०१८ मध्ये त्यांनी हिरीयूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.
सुधाकरांचे स्पष्टीकरण
दरम्यान, सीडी प्रकरणात आपला कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्टीकरण सुधाकर यांनी दिले आहे. सुधाकर म्हणाले, “”या प्रकरणात माझे नाव ओढले गेल्याचे पाहून मला धक्का बसला आहे. जर या प्रकरणी मला काही भीती वाटत असती, तर मी अटकपूर्व जामीन मिळविला असता. सीडीमधील महिलेला मी कधीही पैसे वर्ग केले नाहीत. ”