वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जुनी वाहने भांगारात (व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर ) काढण्याच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी गुजरातमध्ये परिषद आयोजित केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. Conference in Gujarat on Vehicle Scrapping Policy; Prime Minister Modi will guide
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पुढाकाराने ही परिषद होत आहे. परिषदेत गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या वर्षी २६ जुलै लरोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या १५ वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे, अशी तरतूद केली होती. त्या दृष्टीने आजची ही परिषद महत्वाची मानली जात आहे.
काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी?
सरकारी विभागाची वाहने म्हणजे सर्व मंत्रालयातील वाहनं, पोलिस, प्रशासनाकडून वापरण्यात येणारी वाहने, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इतर विभागामध्ये १५ वर्षाहून जुनी भंगारात काढण्यात येतील. तसे एसटी आणि बेस्टच्या बस, सार्वजनिक उद्योगांतील वाहनेही भंगारात काढण्यात येतील. भंगारात गेलेल्या जुन्या साहित्याचा पुनर्वापर करता येईल आणि त्यामुळे वाहनांच्या किंमतीत घट होईल. या धोरणांतर्गत केंद्र सरकार पाच वर्षात दोन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये चार टप्पे
- नवीन वाहन खरेदी केले तर पाच टक्क्यांपर्यंत सूट
- जुन्या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक
- २०, १५ वर्ष जुन्या वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेट
- ऑटोमेटेड फिटनेस सेंटर पीपीपी मोडमध्ये सुरु
स्क्रॅपिंग पॉलिसीचा फायदा काय?
- देशात वाहन क्षेत्रात मोठी वाढ होईल
- वाहन क्षेत्राची उलाढाल सुमारे साडेचार लाख कोटी
- पॉलिसी लागू झाल्यानंतर दहा लाख कोटीपर्यंत
- देशात लाखो रोजगारांची निर्मिती होईल
Conference in Gujarat on Vehicle Scrapping Policy; Prime Minister Modi will guide
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध