• Download App
    यंत्रमाग धारकांना वीज बिलात देणार सवलत ; वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती|Concessions will be given to loom holders for electricity bills; Information of Textile Minister Aslam Sheikh

    यंत्रमाग धारकांना वीज बिलात देणार सवलत ; वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती

    वृत्तसंस्था

    इचलकरंजी :यंत्रमागधारकांची थांबविण्यात आलेली वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.Concessions will be given to loom holders for electricity bills; Information of Textile Minister Aslam Sheikh

    वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केली नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद केली होती. त्या निर्णयास तूर्त स्थगिती दिली आहे.अस्लम शेख यांनी रविवारी, इचलकरंजी येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते.



    त्याची पूर्तता करून वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल सवलत पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणाली सुलभ करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापित करण्याबरोबरच यंत्रमागधारकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Al Falah Group : दिल्ली स्फोटप्रकरणी अल फलाह ग्रुपच्या सचिवाला अटक; खोटे दावे करून विद्यापीठाने कोट्यवधी उकळले

    TRAI : बनावट SMS आणि फसवणूक रोखण्यासाठी ट्रायचा नवा नियम; व्यावसायिक SMS साठी प्री-टॅगिंग अनिवार्य

    Central Govt : केंद्र सरकारचा खासगी टीव्ही चॅनेल्सना कडक इशारा- संवेदनशील कंटेंट प्रसारित करू नका, दिल्ली स्फोट कव्हरेजमध्ये निष्काळजीपणा