Ghaziabad Incident : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडिओवरून वाद वाढत आहे. बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी आणि इतरांविरोधात राजधानी दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील टिळक मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. Complaint against Swara Bhaskar And Arfa Khanam In Gaziabad Incident
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडिओवरून वाद वाढत आहे. बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी आणि इतरांविरोधात राजधानी दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील टिळक मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अॅड. अमित आचार्य यांनी टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पत्रकार आरफा खानम शेरवानी आणि अभिनेता आसिफ खान यांचीही नावे तक्रारीत देण्यात आली आहेत. या सर्वांनी या प्रकरणात चिथावणीखोर ट्विट केल्याचा आरोप आहे. अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे, परंतु पोलीस तपास करत आहेत.
स्वराने एफआयआरवर प्रश्न उपस्थित केले होते
स्वरा भास्करने ट्विटरवर लिहिले की, ‘गाझियाबाद प्रकरणातील पीडित व्यक्तीचा कौटुंबिक व्यवसाय सुतारकाम आहे. त्याला ताईत बनविण्याविषयी काहीही माहिती नाही. अटक केलेल्या सहआरोपीचा भाऊही पोलिसांच्या वक्तव्याला आव्हान देत आहे. या दाव्यांची चौकशी केली पाहिजे.
तिने लिहिले, ‘कुटुंबाने 6 जून रोजी केलेल्या लेखी तक्रारीच्या मूळ प्रतीमध्ये याची पुष्टी झाली आहे. मात्र, पोलिसांनी याची खातरजमा केली नाही. सीलवर लिहिलेली तारीख दाखवते की एफआयआरच्या आधी हल्लेखोरांनी सैफीवर जय श्रीराम बोलण्याचा आरोप पोलिसांच्या निदर्शनास आणला होता.’
रिपोर्टिंगला गुन्हा बनवण्याचा प्रयत्न : आरफा
एफआयआरवर भाष्य करताना आरफा यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘अधिकृत घटनेच्या बाहेर असलेल्या घटनेच्या बातमी देण्याला गुन्हा ठरवण्याचा हा प्रयत्न आहे. एका गुन्ह्यातील पीडित व्यक्तीन स्वतः घटनेबद्दल काय म्हटले आहे याची रिपोर्टिंग केल्याबद्दल द वायरवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
मग गाझियाबादमध्ये नेमके घडले तरी काय?
- लोणी परिसरात अब्दुल समद नावाच्या वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरसह 9 जणांवर एफआयआर नोंदविला होता. या घटनेला चुकीच्या पद्धतीने धार्मिक रंग दिल्यामुळे या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि दाढी कापल्याचे दिसून आले आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे सत्य वेगळे आहे. पीडित वृद्ध व्यक्तीने आरोपीला काही ताईत दिले होते, ज्यामुळे आरोपींना फायदा झाला नाही, यामुळे संतप्त आरोपींनी ही मारहाण केली. तथापि, ट्विटरने व्हिडिओला “मॅनिपुलेटेड मीडिया” म्हणून टॅग केले नाही. पोलिसांनी असेही सांगितले की, पीडित व्यक्तीने जय श्रीरामच्या घोषणा किंवा दाढी कापायला लावल्याबद्दल एफआयआरमध्ये नोंदवलेले नाही.
- ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये अय्यूब आणि नकवी हे पत्रकार आहेत, तर जुबैर हे ऑल्ट न्यूज या फेक्ट-चेकिंग वेबसाइटचे लेखक आहेत. डॉ. शमा मोहम्मद आणि निझामी हे कॉंग्रेसचे नेते आहेत. तर अलिगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष उस्मानी याला कॉंग्रेसने गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केले होते.
Complaint against Swara Bhaskar And Arfa Khanam In Ghaziabad Incident
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांना बढती, मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नेमणूक
- काँग्रेसला स्वबळाच्या मरणाने मरू देत एकत्र लढण्याचा शिवसेना- राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन
- डॉक्टरांचे हात पाय बांधून लोणावळ्यात ७० लाखांचा दरोडा, शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी अर्धा तास ठेवले ओलिस
- कोणाच्या जोरावर छाती फुगवता, तुमचा उध्दव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आलाय, नितेश राणे यांचा हल्लाबोल
- भाजपमधून तृणमूळमध्ये गेलेल्या मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा काढली… पण का…?? केव्हा…?? आणि कशी…??