• Download App
    हिंदूत्वा ची तुलना तालीबान्यांशी, अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी|Comparison of Hindutva with Taliban, demand for filing a case of treason against actress Swara Bhaskar

    हिंदूत्वा ची तुलना तालीबान्यांशी, अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तालीबानची तुलना हिंदूत्वाशी करणाऱ्या आणि हिंदू दहशवादावर नाराजी व्यक्त करणा ऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. अरेस्टस्वराभास्कर असा ट्रेंडही सोशल मीडियावर सुरू झाला आहे.Comparison of Hindutva with Taliban, demand for filing a case of treason against actress Swara Bhaskar

    अभिनेत्री स्वरा भास्करचा कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने वादग्रस्त विधान केले आहे. स्वरा भास्करने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण हिंदुत्वाच्या दहशतीपासून वाचू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे.



    आपण तालिबानच्या दहशतीने शांत बसू शकत नाही आणि आपण सगळे हिंदुत्वाच्या आतंकवादावर नाराज होत असतो. आपले मानवीय आणि नैतिक मूल्य हे दडपशाहीवर आधारीत नसले पाहिजे,स्वराने अफगाणिस्तानमधल्या सद्य परिस्थितीवर आपले मत मांडले होते.

    तिने आपले मत व्यक्त करण्यासाठी एक ट्विट शेअर केले. यात तिने अफगाणिस्तानमधील परिस्स्थितीची तुलना भारतासोबत केली आहे. त्यामुळे काही नेटक-यांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी केली तर काहींनी तिला बायकॉट करा, असे म्हटले आहे.

    स्वरा भास्करच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर नेटक-यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. तिला अटक करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. ‘स्वरा भास्करने आमच्या भावना दुखावल्या आहेत, तिला अटक करा’, अशी मागणी एका नेटक-याने केली आहे. एवढाच त्रास होत असेल तर अफगाणिस्तानला निघून जा, तिथे ना हिंदू आहेत ना हिंदुत्व इथे हिंदुस्तानात का राहतेय, असा प्रश्न तिला विचारला आहे.

    Comparison of Hindutva with Taliban, demand for filing a case of treason against actress Swara Bhaskar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य