• Download App
    अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठात सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यासक्रम; पाकिस्तानी आणि इजिप्शियन लेखकांची पाठ्यपुस्तके हटविण्यावरही मंथन!!Comparative Course of All Religions in Aligarh Muslim University

    अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठात सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यासक्रम; पाकिस्तानी आणि इजिप्शियन लेखकांची पाठ्यपुस्तके हटविण्यावरही मंथन!!

    वृत्तसंस्था

    अलिगढ़ : अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठाने शताब्दी महोत्सव नंतर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डिपार्टमेंट ऑफ इस्लामिक स्टडीज तर्फे सर्व धर्मांच्या तौलनिक अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे. यामध्ये इस्लामी धर्माबरोबरच सनातनी हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, पारशी धर्म आदी धर्मांचा तौलनिक अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात सुरू होणार आहे. Comparative Course of All Religions in Aligarh Muslim University

    त्याचबरोबर विद्यापीठांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एक मोठे मंथन देखील सुरू आहे, ते म्हणजे विविध अभ्यासक्रमांमधून पाकिस्तानी आणि इजिपशन लेखकांची जी पाठ्यपुस्तके आहेत ती बाजूला काढून त्याऐवजी भारतीय लेखकांची पाठ्यपुस्तके नेमण्याचा विचारविनिमय सुरू आहे.

    अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठाचा गेल्या वर्षी शताब्दी समारंभ झाला. त्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या शैक्षणिक परंपरेची स्तुती केली होती. त्याचवेळी त्यांनी विद्यापीठांमध्ये विद्यापीठाच्या नावात जरी मुस्लिम शब्द असला तरी सर्व धर्मांचा येथे तौलनिक अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या विद्यापीठात मुस्लिम विद्यार्थ्यांबरोबरीने अन्य धर्मीय विद्यार्थी देखील शिकत आहेत.

    या पार्श्वभूमीवर अलीगड विद्यापीठाच्या विद्या परिषदेने डिपार्टमेंट ऑफ इस्लामिक स्टडीज मधून सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर वर्षांसाठी सुरू करण्याचे योजले आहे. हा अभ्यासक्रम नेमका कसा असेल?, त्याची रचना कशी असेल? आणि त्यासाठी कोणती पाठ्यपुस्तके नेमली जातील?, त्याला प्रतिसाद कसा असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Comparative Course of All Religions in Aligarh Muslim University

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य