• Download App
    थंडीमुळे गंभीर आजार, मृत्यूचाही धोका; कोरोनाबाबत राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचा इशारा । Colds cause serious illness, even death; President Biden warns of corona

    थंडीमुळे गंभीर आजार, मृत्यूचाही धोका; कोरोनाबाबत राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचा इशारा

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लोकांना इशारा दिला आहे. बिडेन म्हणाले की ज्या लोकांना लस मिळत नाही त्यांना या हिवाळ्यात गंभीर आजार आणि मृत्यूला सामोरे जावे लागू शकते. Colds cause serious illness, even death; President Biden warns of corona

    अमेरिकेत ओमिक्रॉनचा वेगाने प्रसार होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. संसर्गा संदर्भात वैद्यकीय तज्ञांशी झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले की, देश ओमिक्रॉनला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. देशात बूस्टर डोस दिला जात आहे. प्रवासाबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यूएस मध्ये १ डिसेंबर रोजी सरासरी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या ८६००० होती, जी १४ डिसेंबर रोजी १, १७,००० वर पोहोचली आहे.



    कोविड टॅबलेटचा वापर

    कोरोनाच्या ओमीक्रोनमुळे,चौथ्या लाटेपर्यंत पोहोचलेले युरोपियन देश आता त्याचा सामना करण्यासाठी फायझर कंपनीच्या कोविड टॅबलेटचा वापर करतील. युरोपियन युनियनच्या औषध नियामकाने या टॅब्लेटच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

    अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने दावा केला आहे की टॅब्लेटच्या वापरामुळे कोरोना रुग्ण आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ९० टक्क्यांपर्यंत कमी होईल. युरोपियन मेडिसिन एजन्सीने ऑक्सिजन पुरवठ्याची गरज नसलेल्या प्रौढांसाठी फायझर टॅब्लेटच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली.

    Colds cause serious illness, even death; President Biden warns of corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख