• Download App
    कार्बनचे हवेतील प्रमाण धोकादायक पातळीवर, वाढीने उच्चांक गाठल्याने शास्त्रज्ञ हादरले। CO2 increased in air tremendously

    कार्बनचे हवेतील प्रमाण धोकादायक पातळीवर, वाढीने उच्चांक गाठल्याने शास्त्रज्ञ हादरले

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढण्याचा वेग आश्चआर्यकारकरित्या अधिक आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. CO2 increased in air tremendously

    अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरशास्त्र आणि हवामान प्रशासन विभागाने या बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूची सरासरी पातळी दर दहा लाख कणांमागे ४१९.१३ इतकी आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यात १.८२ ने वाढ झाली आहे. औद्योगिकीकरण पूर्व काळात हवेतील कार्बन वायूचे प्रमाण दर दहा लाख कणांमागे २८० इतके होते.



    उन्हाळ्याच्या काळात मे महिन्यात हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण मोजले जाते. बहराचा हंगाम सुरु झाल्यावर झाडांकडून नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात कार्बन शोषला जातो. मात्र, मानवनिर्मित घडामोडींमुळे हवेत सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण त्या तुलनेत कितीतरी अधिक असल्याने प्रदूषणात आणि परिणामी जागतिक तापमानात वाढ होते आहे.

    हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढण्याचा वेग आश्च र्यकारकरित्या अधिक आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. उदाहरणार्थ, शीतयुगानंतर पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनचे प्रमाण दर दहा लाख कणांमागे ८० भाग इतक्या प्रमाणात वाढले. हे प्रमाण वाढण्यासाठी सहा हजार वर्षे लागली. मात्र, सध्या कार्बनचे प्रमाण याहून अधिक वेगाने वाढत असून ही वाढ काही दशकांमध्येच झाली आहे. तुलना करायची झाल्यास, १९७९ ते २०२१ या ४२ वर्षांच्या काळातच कार्बनचे प्रमाण ८० भागांनी वाढले आहे.

    CO2 increased in air tremendously

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची