• Download App
    बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्र्यांचा सर्वपक्षीय विचार विनिमय, सोनियांची काँग्रेस मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा | CM Uddhav thackeray calls all party meet, sonia gandhi takes the stock of the situation of congress ruled states

    बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्र्यांचा सर्वपक्षीय विचार विनिमय, सोनियांची काँग्रेस मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

    बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्र्यांचा सर्वपक्षीय विचार विनिमय, सोनियांची काँग्रेस मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा


    वृत्तसंस्था

    मुंबई – नवी दिल्ली – कोरोना प्रादूर्भावाची साखळी तोड़ण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे, तर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत आहेत. सोनियांच्या बैठकीला महाराष्ट्रातून ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. CM Uddhav thackeray calls all party meet, sonia gandhi takes the stock of the situation of congress ruled states

    कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधावरून महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय केला जाईल. रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल आणि अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.



    राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, तर सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडणारच, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

    ११ ते १४ एप्रिल लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पण लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातल्या परिस्थितीची माहिती सोनिया गांधींना दिली आहे. पंजाबचे अमरिंदर सिंग, छत्तीसग़डचे भूपेश बघेल, राजस्थानचे अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी झाले आहेत.

    CM Uddhav thackeray calls all party meet, sonia gandhi takes the stock of the situation of congress ruled states

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले