Kerala Cabinet : केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीच्या पिनराई विजयन सरकारने नवीन मंत्रिमंडळ स्थापनेद्वारे सर्वांनाच चकित केले. सीएम पिनाराय विजयन यांनी आधीच्या कार्यकाळातील सर्वांना आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. या मंत्र्यांमधील सर्वात मोठे नाव म्हणजे केके शैलजा, ज्या राज्यातील कोरोना संकटातील कामासाठी प्रसिद्ध आहेत. आणि दुसरी चर्चा होतेय ती विजयन यांचे जावई पीए मोहम्मद रियास यांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीची! CM Pinarai Vijayans son-in-law gets berth; all old ministers dropped From New Kerala Cabinet
वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीच्या पिनराई विजयन सरकारने नवीन मंत्रिमंडळ स्थापनेद्वारे सर्वांनाच चकित केले. सीएम पिनाराय विजयन यांनी आधीच्या कार्यकाळातील सर्वांना आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. या मंत्र्यांमधील सर्वात मोठे नाव म्हणजे केके शैलजा, ज्या राज्यातील कोरोना संकटातील कामासाठी प्रसिद्ध आहेत. आणि दुसरी चर्चा होतेय ती विजयन यांचे जावई पीए मोहम्मद रियास यांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीची!
मुख्यमंत्री पिनराई विजयन वगळता या वेळी पूर्णपणे नवीन सरकार स्थापन झाले आहे. पक्षाचे सचिव ए. विजयराघवन यांच्या पत्नी आर. बिंदू यांचादेखील मंत्रिमंडळात समावेश आहे. आर. बिंदू आणि वीणा जॉर्ज यांच्या रूपाने पिनराई विजयन यांच्या टीममध्ये दोन महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. त्याशिवाय एम. व्ही. गोविंदन, पी. राजीव, के.एन. बालागोपाल, व्ही. शिवानकट्टी, व्ही.एन. वसावन, साजी चेरियन, व्ही. अब्दुल रहमान यांचा समावेश आहे. दुसरीकडे विधानसभेच्या सभापतिपदी लोकसभेचे माजी खासदार एम.बी. राजेश यांची निवड झाली आहे.
कोरोना नियंत्रणासाठी शैलजा चर्चेत
केरळमधील कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या वेळी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यासाठी शैलजा यांना प्रसिद्धी मिळाली होती. यापूर्वी निपाह विषाणूच्या प्रसारादरम्यानही शैलजा चर्चेत आल्या होत्या. सप्टेंबरमध्ये, यूकेमधील प्रॉस्पेक्ट मासिकाने शैलजा यांना “सन 2020च्या टॉप थिंकर’ म्हणून निवडले होते. ‘शैलजा टीचर’ म्हणून त्यांना ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी मिळवला. त्या कन्नूर जिल्ह्यातून 60 हजार मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत.
यामुळे आता पिनराई सरकारमध्ये मंत्री शैलजा कॅबिनेटमध्ये नसल्याचे पाहून सर्व चकित झाले आहेत. नव्या कॅबिनेटमध्ये दोन महिलांना मुख्य पोर्टफोलियो दिले जाणार आहेत. 140 विधानसभा जागांपैकी एलडीएफने 99 जागा जिंकल्या होत्या. यात सीपीआयएम 62 आणि सीपीआयला 17 जागांवर विजय मिळाला आहे. डाव्यांच्या विजयाचे मुख्य कारण राज्यातील आरोग्य क्षेत्रातील चांगली कामगिरी असल्याचेही सांगितले जात आहे.
CM Pinarai Vijayans son-in-law gets berth; all old ministers dropped From New Kerala Cabinet
महत्त्वाच्या बातम्या
- Cyclone Tauktae चे तांडव, मुंबईहून 175 किमी अंतरावर भारतीय जहाज बुडाले, 130 जण बेपत्ता, नौदलामुळे 146 जण बचावले
- Congress Toolkit Leaked : ईद आनंदोत्सव, तर कुंभ म्हणजे सुपरस्प्रेडर, काँग्रेसच्या टूलकिटमध्ये मोदी सरकार व हिंदूंना बदनाम करण्याची रूपरेषा
- Congress Toolkit Exposed : महामारीच्या आडून काँग्रेसचा देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न, टूलकिटचा भाजपकडून पर्दाफाश
- हरियाणातील मुस्लिम युवकाच्या मृत्यूला शरजील उस्मानीने दिला धार्मिक अँगल, म्हणाला- जय श्रीराम म्हणणारे टेररिस्ट!
- Narada Case : कोलकाता हायकोर्टाने ममता बॅनर्जींना फटकारले, म्हणाले- ‘ही असाधारण स्थिती, गर्दीची दडपशाही चालणार नाही!’