• Download App
    तामिळनाडूत कोरोनामुळे आईवडिलांना गमावलेल्या बालकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची घोषणा । CM mk stalin announces rs 5 lakh assistance to children who lost both the parents due to covid

    तामिळनाडूत कोरोनामुळे आईवडिलांना गमावलेल्या बालकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची घोषणा

    CM MK Stalin : कोरोनामुळे आई-वडील दोघांनाही गमावलेल्या मुलांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. स्टालिन यांनी शपथ घेतल्यानंतर प्रथम त्यांनी प्रत्येक कुटुंबाला कोरोना मदत म्हणून 4,000 रुपये देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. CM mk stalin announces rs 5 lakh assistance to children who lost both the parents due to covid


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : कोरोनामुळे आई-वडील दोघांनाही गमावलेल्या मुलांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. स्टालिन यांनी शपथ घेतल्यानंतर प्रथम त्यांनी प्रत्येक कुटुंबाला कोरोना मदत म्हणून 4,000 रुपये देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती.

    यानंतर, 12 मे रोजी स्टालिन यांनी कोविड रुग्णांच्या उपचारादरम्यान कर्तव्यावर आपले प्राण गमावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची घोषणा केली. त्यांनी डॉक्टरांच्या कुटुंबींयांना 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली होती. स्टालिन यांनी कोविड रुग्णांच्या उपचारात गुंतलेल्या वैद्यकीय सेवा कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्याचीही घोषणा केली.

    एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी प्रोत्साहन योजनेनुसार कोविडची दुसरी लाट आल्यापासून डॉक्टरांना 30 हजार रुपये, परिचारिका व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 20,000 रुपये दिले जातील. याशिवाय सफाई कामगार, मजुरांनाही पैसे दिले जातील. सीटी स्कॅन विभागात, याशिवाय रुग्णवाहिका कर्मचार्‍यांनाही 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

    पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठीही मदत जाहीर

    याव्यतिरिक्त मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी नुकतेच राज्यातील कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबींयांना देण्यात आलेल्या भरपाईची रक्कम पाच लाखांवरून दहा लाखांपर्यंत वाढविली आहे. मुख्यमंत्र्यांनी महामारीवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येणारी प्रोत्साहन रक्कम 3 हजार रुपयांवरून 5 हजार रुपयांपर्यंत वाढविली होती.

    CM mk stalin announces rs 5 lakh assistance to children who lost both the parents due to covid

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले