• Download App
    सीएम केजरीवाल पंतप्रधान मोदींना का म्हणाले, गुस्ताखी माफ करा!, असे काय झाले मीटिंगमध्ये? वाचा सविस्तर... । CM Kejriwal Apologies To Pm Modi For Live telecast Of inhouse Meeting on Corona Crisis

    सीएम केजरीवाल पंतप्रधान मोदींना का म्हणाले, गुस्ताखी माफ करा!, असे काय झाले मीटिंगमध्ये? वाचा सविस्तर…

    CM Kejriwal Apologies To Pm Modi : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विचित्र घटना समोर आली. कोरोनामुळे ढासळत असलेल्या परिस्थितीवर ही उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. परंतु आता चर्चा सुरू आहे ती, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही बैठक प्रोटोकॉल मोडून लाईव्ह केल्याबाबत. CM Kejriwal Apologies To Pm Modi For Live telecast Of inhouse Meeting on Corona Crisis 


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विचित्र घटना समोर आली. कोरोनामुळे ढासळत असलेल्या परिस्थितीवर ही उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. परंतु आता चर्चा सुरू आहे ती, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही बैठक प्रोटोकॉल मोडून लाईव्ह केल्याबाबत. वास्तविक, 10 राज्यांच्या मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑनलाइन बैठक घेत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पाळी येताच या अख्ख्या मीटिंगचे लाइव्ह टेलिकास्ट देशात वृत्तवाहिन्यांद्वारे दिसू लागले. केजरीवाल यांची भाषा सरळ नव्हती.

    केजरीवालांनी लाइव्ह केली मीटिंग

    केजरीवाल पंतप्रधानांना म्हणत होते की, केंद्राने दिल्लीसाठीचा ऑक्सिजन कोटा वाढवला, याबद्दल आम्ही आभारी आहोत. परंतु परिस्थिती खूप गंभीर आहे. आम्ही कुणालाही मरण्यासाठी सोडू शकत नाही. आम्ही मागच्या काही दिवसांत अनेक मंत्र्यांना फोन केले. त्यांनी आधी मदत केली, परंतु आता तेही थकले आहेत. आम्हाला जनतेला विश्वास द्यावा लागेल की, एकेक जीवन अमूल्य आहे. आम्ही दिल्लीतील जनतेच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, लगेच काही पाऊल उचलले नाही, तर दिल्लीत हाहाकार उडेल. मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे.

    सर्वात जास्त ऑक्सिजनचे ट्रक रोखले जात आहेत. जर तुम्ही अशा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक फोन केला, तरी पुरेसे होईल. मी मुख्यमंत्री असूनही काहीही करू शकत नाहीये. देव न करो, काही अनुचित झाले तर आम्ही स्वत:ला कधीही माफ करू शकणार नाहीत. आपल्याला एक राष्ट्रीय प्लॅन बनवला पाहिजे. याअंतर्गत देशाच्या सर्व ऑक्सिजन प्लांटला लष्कराच्या माध्यमातून टेकओव्हर करावे. प्रत्येक ट्रकसोबत आर्मीची एस्कॉर्ट व्हेइकल असेल तर त्यांना कुणीही रोखू शकणा नाही. 100 टन ऑक्सिजन ओडिशा आणि बंगालवरून यायची आहे. आम्ही ते दिल्लीत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. झालेच तर आम्हाला विमान उपलब्ध करून द्या, किंवा मग तुमची जी आयडिया आहे, ऑक्सिजन एक्स्प्रेसची, त्यानेच आम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा.

    यावर पंतप्रधानांनी टोकले की, ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑलरेडी सुरू आहे. त्यावर केजरीवाल म्हणाले, जी, परंतु दिल्लीत येत नाहीये, इतर राज्यांत सुरू आहे.’

    पुन्हा म्हणाले, ‘लस निर्मात्या कंपनीने आता म्हटलेय की, केंद्र सरकारला लस 150 रुपयांत आणि राज्यांसाठी 400 रुपये दर असेल. एकाच देशात लसीचे दोन रेट कसे असू शकतात? लसीचाही वन नेशन, वन रेट असला पाहिजे.’ प्रत्येक जीव आपल्यासाठी अमूल्य आहे. सर्वांना औषधे, लस आणि ऑक्सिजन कोणत्याही वादाशिवाय आणि अडथळ्याविना मिळावा. कोरोनाविरुद्ध एक नॅशनल प्लॅन असेल तर आपण सर्व मिळून काम करू शकू. यानंतर सर्व वाहिन्यांवरील हे प्रसारण एकदम थांबले. तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. यानंतर दोन तासांनी विविध वाहिन्यांवर केजरीवाल पुन्हा दिसले.

    पंतप्रधानांनी केजरीवालांना करून दिली जाणीव

    आता ते म्हणत होते की, ‘मला विश्वास आहे की, या देशात आम्ही एक नॅशनल प्लॅन बनवू, आम्ही सर्व राज्ये केंद्रासोबत मिळून काम करू. कोरोनामुळे दिवंगत आत्म्यांना शांती मिळो.

    तेवढ्यात पंतप्रधान मोदींनी केजरीवालांना हटकले की, ‘एक मिनिट, एक गोष्ट मला सांगायची आहे. आपली जी परंपरा आहे, आपले प्रोटोकॉल आहेत, हे सर्व त्याविरुद्ध होत आहे. कोणताही मुख्यमंत्री अशा इनहाऊस मीटिंगला लाइव्ह टेलिकास्ट करू शकत नाही. हे योग्य नाहीये, आपण सदैव संयम पाळला पाहिजे.’

    यानंतर केजरीवाल गप्प बसले, त्यांना चूक लक्षात आली. म्हणाले, ठीक आहे सर, यापुढे हे लक्षात ठेवीन. सर माझ्याकडून काही गुस्ताखी झाले असेल… मी काही कठोर बोललो असेल, माझ्या आचरणात काही चूक असेल, तर मला माफ करा.” यानंतर सर्वत्र आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे.

    CM Kejriwal Apologies To Pm Modi For Live telecast Of inhouse Meeting on Corona Crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य