वृत्तसंस्था
चंदीगड : काल महागाईविरोधात हत्तीवर चढलेले नवज्योत सिंग सिद्धू हे सुप्रीम कोर्टाची एक वर्षभराची शिक्षा ऐकताच सरेंडर करण्यापूर्वी आजारी पडले आहेत. 34 वर्षांपूर्वीच्या रोड रेज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कालच एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा होण्याच्या वेळी नवज्योत सिंग सिद्धू दिल्लीत नसून पतियाळात होते. ते कालच महागाई विरोधातील आंदोलनामध्ये हत्तीवर चढून बसले होते. पण त्यांना सुप्रीम कोर्टाने आपल्याला 1 वर्षाची शिक्षा दिल्याची बातमी समजली आणि ते आजारी पडले. Climbed the elephant against inflation yesterday; But before he could surrender, Sidhu fell ill
आता नवज्योत सिद्धू यांनी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. यामध्ये सिद्धू यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. सिद्धू यांनी यासाठी आजारी असल्याचे कारण दिले आहे. या प्रकरणी सिद्धूंना शिक्षा सुनावणाऱ्या खंडपीठाने क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर म्हणाले की, आम्ही हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवत आहोत, ते त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतील. मात्र, सुप्रीम कोर्टाने दिलासा न दिल्यास सिद्धू यांना आज शरण जावे लागणार आहे.
34 वर्षे जुन्या रोड रेजप्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सिद्धूंची शिक्षा 1 वर्षाने वाढवली. त्याचबरोबर आत्मसमर्पणाच्या वेळी सिद्धू समर्थक त्यांच्या घराभोवती जमा झाले आहेत. पतियाळा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनीही यासंदर्भात कार्यकर्त्यांना संदेश पाठवला आहे. सिद्धू सध्या त्यांच्या पतियाळा येथील घरात आहे. त्यांचे समर्थक काँग्रेस नेत्यांपर्यंत पोहोचू लागले आहेत.
हायकोर्टातून सेशन कोर्टात पोहोचतील ऑर्डर
सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्रथम पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचणार आहे. तेथून त्यांना पतियाळाच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाठवण्यात येणार आहे. सिद्धू यांनी स्वत: आत्मसमर्पण केल्यास संबंधित पोलिस ठाण्याला अटक करण्यास सांगितले जाईल.
मृत गुरनाम सिंग यांच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. त्यांची सून परवीन कौर म्हणाल्या की, 34 वर्षांच्या लढाईत त्यांचे मनोबल कधीही ढासळले नाही. क्रिकेटपटू आणि नेता म्हणून सिद्धूंच्या लौकिकाकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. सिद्धूंना शिक्षा व्हावी एवढाच त्यांचा उद्देश होता.
केव्हा काय घडले…
- 27 डिसेंबर 1988 रोजी पतियाळा येथे पार्किंगवरून सिद्धूंचे 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी भांडण झाले. सिद्धूंनी त्याला धक्काबुक्की केली. नंतर गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला. सिद्धू आणि त्यांचा मित्र रूपिंदर सिंग यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- 1999 मध्ये सत्र न्यायालयाने सिद्धूंची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. याविरोधात पीडित पक्षाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली.
- 2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धूंना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
- जानेवारी 2007 मध्ये सिद्धूंनी न्यायालयात आत्मसमर्पण केले. ज्यामध्ये त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. त्यानंतर सिद्धू सर्वोच्च न्यायालयात गेले.
- 16 मे 2018 रोजी सुप्रीम कोर्टाने सिद्धूंना कलम 304 IPC अंतर्गत आरोपातून निर्दोष मुक्त केले. तथापि, आयपीसी कलम 323, म्हणजे दुखापत झाल्यास, एक हजाराचा दंड ठोठावला. याविरोधात पीडिताच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
Climbed the elephant against inflation yesterday; But before he could surrender, Sidhu fell ill
महत्वाच्या बातम्या
- ऐतिहासिक कामगिरी : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखात झरीनला सुवर्णपदक!!
- 1991 प्रार्थनास्थळ कायदा : नरसिंह रावांनी अडवाणींचे ऐकले असते तर??; स्वामी गोविंददेव गिरीही रावांबद्दल सकारात्मक का बोलले??चिंतनानंतरचे धक्के : “हाताला नाही काम”, म्हणत हार्दिक पटेलचा काँग्रेसला रामराम!!
- Supreme Court : मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाची परवानगी
- स्वतः नरसिंहराव पुन्हा आले तरी 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा बदलतील!!; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे प्रतिपादन