वृत्तसंस्था
नवी दिल्ली – पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक तज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही रामण्णा यांनी सीनियर अॅड. सीयू सिंग यांना ही माहिती दिली. सिंग हे पेगासस प्रकरणात उपस्थित या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. याबाबत पुढील आठवड्यात आदेश जारी केला जाईल. CJI NV Ramana says the Supreme Court is setting up a Technical Expert Committee to inquire into the alleged Pegasus snooping row
सरन्यायाधीशांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सांगितलं की, आम्हाला या आठवड्यात ऑर्डर द्यायची होती. आम्ही तज्ज्ञांची समिती तयार करत आहोत. मात्र एका सदस्यानं वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रकरण लांबले आहे.
पेगासस हेरगिरी प्रकरणात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेचे अख्खे अधिवेशन गदारोळ करून बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. मोदी सरकारला दोन आठवडे घेरून टाकण्याचा प्रयत्न केला होता. सुप्रीम कोर्टात यावर विविध याचिका दाखल केल्या. त्यावर अद्याप सुनावणी सुरू आहे.
संसदेत विरोधकांनी गदारोळ करून अधिवेशन बंद पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी मोदी सरकारने त्यावेळी आपल्याला हवी ती विधेयके मंजूर करून घेतली होती.
CJI NV Ramana says the Supreme Court is setting up a Technical Expert Committee to inquire into the alleged Pegasus snooping row
महत्त्वाच्या बातम्या
- PM Modi in US : पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये म्हणाले, भारतीय प्रवासी ही देशाची सर्वात मोठी ताकद
- पीएम मोदी अमेरिकेत पहिल्या दिवशी या नेत्यांना भेटणार, जागतिक सीईओंशी चर्चा, असे आहे पंतप्रधानांच्या पहिल्या दिवसाचे वेळापत्रक
- जी -20 मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले – अफगाणिस्तानची भूमी दहशतीसाठी वापरू नये, तालिबानने आपले वचन पूर्ण करावे
- जगाला लस पुरवण्याच्या भारताच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
- ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार