• Download App
    कोव्हिशिल्ड घेऊनही शरीरात तयार झाल्या नाहीत अ‍ॅँटीबॉडी, लखनऊतील नागरिकाने आदर पूनावाला यांच्याविरुध्द केली तक्रार |Citizens of Lucknow complain against Adar Poonawal, Antibodies are not produced in the body even after taking Kovishield

    कोव्हिशिल्ड घेऊनही शरीरात तयार झाल्या नाहीत अ‍ॅँटीबॉडी, लखनऊतील नागरिकाने आदर पूनावाला यांच्याविरुध्द केली तक्रार

    कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेऊनही शरीरात अ‍ॅँटीबॉडी तयार झाल्या नाहीत म्हणून लखनऊमधील एका नागरिकाने थेट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याविरुध्द तक्रार केली आहे.Citizens of Lucknow complain against Adar Poonawal, Antibodies are not produced in the body even after taking Kovishield


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेऊनही शरीरात अ‍ॅँटीबॉडी तयार झाल्या नाहीत म्हणून लखनऊमधील एका नागरिकाने थेट सिरम इन्स्टिट्यूट ऑ फ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याविरुध्द तक्रार केली आहे.

    लखनऊमधील प्रताप चंद्रा यांनी आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की मी ८ एप्रिलला लसीचा पहिला डोस घेतला होता. २८ दिवसांनी त्यांचा दुसरा डोस होता.



    मात्र, त्याच दिवशी त्यांना लसीच्या दुसऱ्या डोससाठीची मुदत सहा आठवड्यांनी वाढविल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर बारा आठवडे केले.

    लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मला बरे वाटत नव्हते असे सांगताना चंद्रा म्हणाले, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले होते की कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यावर शरीरात चांगल्या अ‍ॅँटीबॉडी तयार होतात.

    मी सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत कोव्हिड अ‍ॅँटीबॉडी टेस्ट करून घेतली. या टेस्टमध्ये कोरोनाविरोधात अ‍ॅँटीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले नाही. उलट माझ्या शरीरातील प्लेटलेटस काऊंट तीन लाखांवरून दीड लाखांवर गेला.

    प्लेटलेटस निम्याने कमी झाल्याने कोरोना होण्याचा धोका जास्त वाढला आहे.चंद्रा यांची तक्रार पोलीसांनी नोंदवून घेतली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.

    चंद्रा यांनी डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्टीय आरोग्य मिशनच्या संचालक अपर्णा उपाध्याय यांची नावेही तक्रारीत दिली आहे.

    हे प्रकरण संवेदनशिल असल्याने वरिष्ठांशी चर्चा करूनच गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले आहे. मात्र, गुन्हा दाखल केला नाही तर आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे.

    Citizens of Lucknow complain against Adar Poonawal, Antibodies are not produced in the body even after taking Kovishield

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक