• Download App
    चिनी ड्रॅगनने आता काढली सोशल मिडीयावर भारताची कुरापत, वादग्रस्त पोस्ट टाकून भारतावर टीका।China target Indias corona situation on social media

    चिनी ड्रॅगनने आता काढली सोशल मिडीयावर भारताची कुरापत, वादग्रस्त पोस्ट टाकून भारतावर टीका

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : वेईबो या सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून चीनमधील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बलशाली आघाडीकडून भारताच्या कोरोना हाताळणीची खिल्ली उडविण्यात आली आहे. China target Indias corona situation on social media

    या अॅपवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. भारतामधील स्मशानभूमीतील सामुहिक अंत्यसंस्काराचे छायाचित्र त्यासाठी वापरले आले. त्याच्या बाजूला चीनने गेल्या आठवड्यात सोडलेल्या प्रक्षेपकाचे छायाचित्र जोडण्यात आले. त्यास देण्यात आलेल्या ओळी मानवतेवरील संकटाची कुचेष्टा करणाऱ्या होत्या. जेव्हा चीन एखादी गोष्ट प्रज्वलित करतो विरुद्ध भारत जेव्हा असे करतो असे त्याखाली नमूद करण्यात आले होते.



    चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय राजकीय आणि विधी व्यवहार आयोगाकडून त्यांच्या वेईबो अकाऊंटवर शनिवारी ही पोस्ट टाकण्यात आली. नंतर ती हटविण्यात आली. ही पोस्ट काही वेळात व्हायरल झाली. चीनमधील ऑनलाइन जगताचे वार्तांकन करणाऱ्या चायना डिजिटल टाईम्सनुसार चायनीज पोलिस ऑनलाइन, तियानजीन महापालिका सरकारी वकील कार्यालय अशा संस्थांच्या अधिकृत अकाउंटवरूनही खिल्ली उडविण्यात आली. त्यासाठी चीन फायर शाईन माऊंटन विरुद्ध भारतीय फायर शाईन माऊंटन असे शिर्षक देण्यात आले.

    China target Indias corona situation on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार