वृत्तसंस्था
बीजिंग : लष्करी अधिकाऱ्यांचा अवमान करण्यास मनाई करणारा नवा कायदा चीनमध्ये मंजूर करण्यात आला आहे. चीन सरकारने लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी हा नवा कायदा आणल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. China made new law for millitary
याबाबतच्या विधेयकाला चिनी संसदेच्या स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली होती. यानुसार, चिनी लष्करातील कोणत्याही व्यक्तीच्या आत्मसन्मानाला धक्का लावणाऱ्या किंवा त्यांची प्रतिमा खराब करणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत.
लष्करी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या फलकाचीही विटंबना किंवा अवमान केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या लष्करी अधिकारी किंवा सैनिकांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करण्यास मनाई करणारा कायदा चीनमध्ये २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत अनेकांना शासनही झाले आहे.
China made new law for millitary
महत्त्वाच्या बातम्या
- मच्छीमारांच्या वारसांना तब्बल चार कोटींची भरपाई, इटलीच्या नौसैनिकांवरील खटला अखेर बंद
- अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स जगाला तब्बल एक अब्ज डोस पुरविणार
- स्वेच्छानिवृत्ती घ्यायचीय?, मग त्याआधी हा सारासार विचार करा
- कूस्तीपटू सुशील कुमारची तुरूंगात प्रथिनयुक्त आहाराची मागणी
- कार्बनचे हवेतील प्रमाण धोकादायक पातळीवर, वाढीने उच्चांक गाठल्याने शास्त्रज्ञ हादरले
- पाणी उतू जात नाही मग दूधच का उतू जाते?