• Download App
    हाँगकाँगच्या लोकप्रिय निवेदकाविरुद्ध चीनकडून देशद्रोहाचा खटला दाखल। China govt fils sedation case against radio anquer

    हाँगकाँगच्या लोकप्रिय निवेदकाविरुद्ध चीनकडून देशद्रोहाचा खटला दाखल

    विशेष प्रतिनिधी

    हाँगकाँग : हाँगकाँग मुक्त करा, आमच्या काळाची क्रांती हीच. भ्रष्ट पोलिसांनो, तुमचे सारे कुटुंब नरकात जाईल अशा लोकप्रिय घोषणा देणारे नामवंत निवेदक ताम ताक-ची यांच्यावर चीनने देशद्रोहाचा खटला भरला आहे. China govt fils sedation case against radio anquer

    ताम ताक-ची असे त्यांचे नाव असून ते ४८ वर्षांचे आहेत. १९९७ मध्ये ब्रिटनने हाँगकाँगचे हस्तांतरण केल्यानंतर असा खटला दाखल करून सुनावणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.



    ताम हे फास्ट बीट या टोपणनावाने लोकप्रिय आहेत. नभोवाणी निवेदकाशिवाय अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते ओळखले जातात. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान त्यांनी दिलेल्या किंवा लिहिलेल्या आठ घोषणा म्हणजे देशद्रोह ठरविण्यात आल्या.

    वसाहतवाद संपुष्टात आल्यानंतर काही दशके हा कायदा वापरला जात नव्हता. गेल्या वर्षभरात मात्र फुटीरतावादी, देशद्रोहाची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे. मतभेद हे गुन्हेगारी स्वरूपाचे ठरावेत हाच यामागील उद्देश आहे. याशिवाय गेल्या वर्षी नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.

    China govt fils sedation case against radio anquer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    2006 च्या साखळी बॉम्बस्फोटातले 12 आरोपी निर्दोष सुटलेच कसे?, अंतर्मुख होऊन विचार करण्याचा उज्ज्वल निकमांचा परखड सल्ला!!

    UIDAI : शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्याची योजना; UIDAI 7 कोटी मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणार

    Chhangur Baba : छांगूर बाबाचा निकटवर्तीय करोडपती बाबूला एटीएसकडून अटक; राजेश उपाध्याय बलरामपूर कोर्टात तैनात